AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनसाखळी चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, नाशकात सुट्टीवरील पोलिसाची पत्नीसह धडाकेबाज कामगिरी

नाशिकच्या पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीसह प्रवासातून घरी येताना दोन सोनसाखळी चोरांना पकडून त्यांना अटक केली आहे. (Nashik Police Couple arrest most wanted theft)

सोनसाखळी चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, नाशकात सुट्टीवरील पोलिसाची पत्नीसह धडाकेबाज कामगिरी
| Updated on: Oct 14, 2020 | 2:32 PM
Share

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरु आहे. नाशिकच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीसह प्रवासातून घरी येताना दोन सोनसाखळी चोरांना पकडून त्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलीस पत्नीने देखील धाडस दाखवून आपल्या पोलीस पतीसह या चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांना पकडून ठेवलं. क्राईम ब्रांचचे पोलीस कर्मचारी गुलाब सोनार आणि त्यांच्या पत्नी ज्योती सोनार यांच्या या धाडसाचं संपूर्ण शहरात कौतुक होतं आहे. (Nashik Police Couple arrest most wanted theft)

गुलाब सोनार हे नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 2 मध्ये काम करतात. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत आहेत. या दाम्पत्याने सिनेस्टाईल पाठलाग करुन दोन सोनसाखळी चोरांना पकडलं. आपलं घरगुती काम आटपून हे दोघेजण संगमनेरवरून नाशिककडे येत होते.  त्याचवेळी रस्त्यात त्या दोघांना दोन जण बाईकवर जाताना दिसले.

गुलाब सोनार यांना त्यांचा चेहरा पाहताच क्राईम ब्राँचच्या डायरीत या चोरांना बघितल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ आपल्या पत्नीला तयार राहण्याची सूचना केली. त्यांनी संगमनेरपासून पाठलाग केल्यानंतर अखेर नाशिकजवळ आले. त्यावेळी त्यांनी सापळा रचून त्या चोरांना पकडलं.

पोलीस कर्मचारी गुलाब सोनार यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीने या चोरांना पकडून ठेवलं. त्यानंतर हुशारीने आरडाओरड करत लोकांना जमा केले. विशेष म्हणजे या आरोपींकडे धारदार शस्त्रास्त्र असताना देखील ज्योती सोनार यांनी धाडसाने त्यांना पकडून ठेवलं.

सोनार दाम्पत्याने पकडलेले हे चोर गेल्या काही वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड आरोपी होते. राजू उर्फ राजाराम खेटू राठोड (हडपसर) आणि नागेश बडवर (बेळगाव) अशी या दोघा आरोपींची नावं आहे. त्यांनी आतापर्यंत मुंबई, सोलापूर, पुणे, सातारा या भागात सोनसाखळी चोरी केली आहे. सोनार दाम्पत्याने जिवाची पर्वा न करता दाखवलेलं धाडस हे कौतुकास्पद आहे. (Nashik Police Couple arrest most wanted theft)

संबंधित बातम्या : 

Solapur Rain Live Update: सोलापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, वैराग-जवळगाव रस्ता पाण्यात, कुरनूर धरणातून विसर्ग

मोबाईल शॉपीवर दरोडा; 16 लाखांचे मोबाईल लंपास, रिकामे बॉक्स मात्र दुकानातच

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.