प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, पोलिसांनी पाच महिन्यांनी प्रेमी युगुलाला पकडलं

मयत पवनकुमारच्या पत्नीची कसून चौकशी केली असता तिने आपल्या प्रेम प्रकरणाची कबुली पोलिसांना दिली. (Woman kills Husband boyfriend)

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, पोलिसांनी पाच महिन्यांनी प्रेमी युगुलाला पकडलं
उत्तर प्रदेशात प्रियकराच्या साथीने महिलेकडून पतीची हत्या

लखनौ : उत्तर प्रदेशात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. महिलेने प्रियकराच्या साथीने पतीची हत्या केल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 16 सप्टेंबर 2020 रोजी बाराबंकी जिल्ह्यातील नाल्यात पवनकुमारचा मृतदेह आढळला होता. (Woman kills Husband with help of boyfriend in Uttar Pradesh)

पवनकुमारचा भाऊ लवलेश बहादूर सिंहच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. मयत पवनच्या पत्नीचे एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महिलेची कसून चौकशी केली असता तिने आपल्या प्रेम प्रकरणाची कबुली पोलिसांना दिली.

घराच्या वाटण्यांमुळे आर्थिक चणचण

पवनकुमारची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अलमापूर गावातून अटक केली. बाराबंकीचे पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी याविषयी माहिती दिली. पवनचे लग्न आरोपी महिलेशी 2012 मध्ये झालं होतं. लग्नानंतर काही दिवसातच पवनच्या घराच्या वाटण्या झाल्या. आर्थिक चणचणीतून पवनने ड्रायव्हरची नोकरी धरली.

दरम्यानच्या काळात पवनने आपल्या पत्नीचे सोन्याचे कानातले गहाण ठेवले. त्या पैशांतून त्याने मद्यपान करण्यास सुरुवात केली. यामुळे आरोपी महिलेचा प्रियकर वैतागला आणि त्याने पवनला जीवे मारण्याचा इशारा दिला. त्यानंतर दोघांनी मिळून पवनच्या हत्येचा कट रचला.

दारुच्या नशेत हत्या

आरोपी प्रियकराने पवनसाठी महागडी दारु विकत आणली. त्यानंतर पवनला त्याने आपल्या घरी बोलावलं. दोन बाटल्या दारु पाजल्यानंतर पवनला झिंग चढली. या संधीचा फायदा घेत त्याने पवनला धक्का दिला आणि नाल्यात फेकून दिलं. पाच महिन्यांनी या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी आरोपी महिला आणि प्रियकराला तुरुंगात पाठवलं आहे.

सफाळ्यात अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड

सफाळ्यात अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेत नवऱ्याने बायको आणि तिच्या प्रियकराची जागीच हत्या केली होती. पालघर तालुक्यातील सफाळे कपासे ठाकूरपाड्यात दिलीप तानाजी ठाकरे राहतात. दिलीप यांनी राहत्या घरी पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं होतं. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी पत्नीसह प्रियकराच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

बायकोचे नातेवाईकासोबत प्रेमसंबंध, नवऱ्याने आक्षेपार्ह स्थितीत पकडले आणि…

(Woman kills Husband with help of boyfriend in Uttar Pradesh)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI