पत्नीची हत्या करुन फरार आरोपी २८ वर्षांनी बॉलीवूड स्टाइलने पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jan 19, 2023 | 9:44 AM

१ फेब्रवारी १९९५ मध्ये सुशीला कांबळे यांचा खून पती रामा कांबळे याने केला. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. खून करुन तो प्रसार झाला. पोलिसात गुन्हा दाखल झाला. परंतु आरोपी काही पोलिसांना मिळाला नाही. आता २८ वर्षांनी तो सापडला.

पत्नीची हत्या करुन फरार आरोपी २८ वर्षांनी बॉलीवूड स्टाइलने पोलिसांच्या ताब्यात
पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण
Follow us on

पुणे : बलीवूड चित्रपटातील कथा किंवा सीआयडी मालिकेप्रमाणे अनुभव तपासादरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांना आला. पोलिसांना एका प्रकरणाच्या तपासादरम्यान एक रंजक प्रकार घडला. पोलीस गेल्या काही दिवसांपासून लैंगिक छळाच्या एका प्रकरणाचा तपास करत होते. याप्रकरणाचा तपास करताना २८ वर्षांपूर्वी पत्नीचा खून (killed wife )करुन फरार झालेला मारेकरी पोलिसांना (police) सापडला. त्या आरोपीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून केला होता. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नाव बदलून राहत होता. दुसरे लग्नही त्याने केले होते.

१ फेब्रवारी १९९५ मध्ये सुशीला कांबळे यांचा खून पती रामा कांबळे याने केला. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. खून करुन तो प्रसार झाला. पोलिसात गुन्हा दाखल झाला. परंतु आरोपी काही पोलिसांना मिळाला नाही.

पोलिसांना कसा मिळाला :

हे सुद्धा वाचा

भोसरी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी लैंगिक छळाचा एक गुन्हा दाखल झाला होता. महेश भीमराव कांबळे हा याप्रकरणातील आरोपी होता. हा तपास सुरु असताना रामा कांबळे या आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. पोलिस रामा कांबळेसंदर्भात विचारपूस करण्यासाठी त्याचे गाव उस्नानाबाद जिल्ह्यातील कोलनूर पांढरीत पोहचली.रामा कांबळे आणि लैंगिक छळाच्या प्रकरणातील आरोपी महेश कांबळे हे दोघेजण एकाच गावातील असल्याची माहिती समोर आली होती. गावच्या सरपंचांकडे चौकशी करताना पोलिसांनी २८ वर्षांपासून फरार असलेल्या रामा कांबळेचा उल्लेख केला.त्यावेळी पोलिसांना जी माहिती मिळाली, त्यामुळे दुसरा गुन्हा उघड झाला. रामा कांबळे हा सोलापूरच्या पालापूर गावात स्थायिक झाला असल्याचे सरपंचांनी सांगितले.

नवीन आधारकार्ड केले, जुनी ओळख पुसली :

पोलिसांनी पालापूर गाव गाठले. त्यावेळी रामा कांबळे हा त्याच गावात राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्याने आपले नाव बदलून राम कोंडिबा बनसोडे ठेवले होते. त्याने आपली जुनी ओळख पुसून टाकली होती. त्याने राम बनसोडे या नावाने नवे आधारकार्ड तयार केले होते. तो उर्से गावातील एका वीटभट्टीवर कामाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी २० वीटभट्ट्या पालथ्या घालून रामा कांबळे याला ताब्यात घेतले.

अशी केली अटक :
रामा कांबळेला अटक केल्यानंतर पोलिसांनी सर्व धागेदोरे जोडायला सुरुवात केली. रामा कांबळेला दुसऱ्या पत्नीपासून तीन मुले होती. रामा कांबळे अधुनमधून उस्मानाबादमधील कोलनूर येथे येत होता. पहिल्या पत्नीपासूनही रामा कांबळे मुलगा होता. त्या मुलाने रामा कांबळेला ओळखले. अखेर पोलीस चौकशीत रामा कांबळेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.