राजीनामा द्या अन् येरवड्यात दाखल व्हा; पुण्याच्या महापौरांची नाना पटोलेंवर खोचक टीका

| Updated on: Jan 18, 2022 | 11:38 AM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे.

राजीनामा द्या अन् येरवड्यात दाखल व्हा; पुण्याच्या महापौरांची नाना पटोलेंवर खोचक टीका
Mayor Murlidhar Mohol
Follow us on

पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि येरवडा रुग्णालयात दाखल व्हा, अशी खोचक टीका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही खोचक टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हा. तुमची बौद्धिक कुवत आणि मानसिक स्थिती पाहता, हेच योग्य आहे. नावापुरता का होईना, पण ‘राष्ट्रीय’ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पंतप्रधानांबद्दल काय बोलावं, याचं काडीचही भान असू नये? असा संतापही महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

बावनकुळे आक्रमक

दरम्यान, पटोले यांनी केलेल्या विधानावर भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत नाना पटोले यांचावर गुन्हा दाखल केल्याची प्रत मिळत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशनमधून हलणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर नाना पटोलेंवर का नाही?, असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.

एक हजाराची मनी ऑर्डर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र काँग्रेस स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे नानांच्या उपचारांसाठी आम्हीच पुढाकार घेऊन त्यांना ईलाजासाठी 1 हजार 1 रुपयांची मनी ऑर्डर करणार आहोत, अशी खोचक टीका जगदीश मुळीक यांनी केलीय. तसंच ‘नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न….आज नाना पटोले यांनी आज केलेले वक्तव्य अत्यंत लांछनास्पद आहे. त्यांनी त्यांची योग्यता ओळखून बोलावे. नाना पटोले यांना तज्ञांकडून मानसिक उपाचारांची गरज असून लवकरात लवकर त्यांनी मानसिक उपचार घ्यावेत’, असा सल्लाही मुळिक यांनी दिला आहे.

 

संबंधित बातम्या:

‘नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही…’ फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर चंद्रकांतदादांचे सर्व जिल्हाध्यक्षांना महत्वाचे आदेश

Video : ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो!’, नाना पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल, भाजपचा जोरदार हल्लाबोल

नाना पटोलेंवर उपचारासाठी पुणे भाजपची 1 हजाराची मनी ऑर्डर! तर पटोलेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, बावनकुळे आक्रमक