Pune Metro : मार्च 2025पर्यंत कार्यान्वित होणार पुणे मेट्रो लाइन 3 प्रकल्प, प्रत्यक्ष कामाला सुरुवात; टाटा प्रोजेक्ट्सनं काय म्हटलं? वाचा…

| Updated on: Aug 30, 2022 | 5:41 PM

सुरुवातीच्या टप्प्यात रायडरशिप 3 लाख असेल, जी येत्या काही वर्षांत 14 ते 15 लाखांपर्यंत जाईल. वाहतूक कोंडी लक्षात घेऊन लोक स्वतःची वाहने चालवण्याऐवजी कॉरिडॉरवर मेट्रो सेवा वापरण्यास प्राधान्य देतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Pune Metro : मार्च 2025पर्यंत कार्यान्वित होणार पुणे मेट्रो लाइन 3 प्रकल्प, प्रत्यक्ष कामाला सुरुवात; टाटा प्रोजेक्ट्सनं काय म्हटलं? वाचा...
संग्रहित छायाचित्र
Image Credit source: HT
Follow us on

पुणे : हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती हबशी जोडणारा पुणे मेट्रो लाइन 3 प्रकल्प (Pune Metro Line 3 project) मार्च 2025पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. टाटा प्रकल्प टप्प्याटप्प्याने काम करण्याऐवजी संपूर्ण 23 किमी लांबीच्या मेट्रोचे काम हाती घेईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects) पुणे मेट्रोचे प्रमुख आलोक कपूर म्हणाले, की हे काम 40 महिन्यांत पूर्ण होईल. आम्ही प्रत्यक्ष काम सुरू केले असून बहुतांश जमीन आमच्या ताब्यात आहे. मार्च 2025पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे. कपूर म्हणाले, की आम्ही मेट्रो अर्धवट चालवण्याऐवजी संपूर्ण 23 किमी मार्गावर ऑपरेशन सुरू करण्याचा विचार करत आहोत. आम्ही भारतात बनवलेले कोच वापरण्यास प्राधान्य देत आहोत. हिंजवडीच्या (Hinjewadi) बाजूला आणि बालेवाडी क्रीडा स्टेडियमजवळील कामाला सुरुवात झाली आहे.

‘एकमेकांना पुरक’

अवजड वाहतुकीचा विचार करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) चौकात काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा विभाग असेल, असे ते म्हणाले. इंटिग्रेटेड डबल डेकर उड्डाणपुलासाठी आम्ही स्थानिक प्राधिकरणांसोबत योजना आखली आहे. आम्हाला मंजुरी मिळाली आहे आणि वाहतूक वळवण्याची योजना देखील तयार आहे, असे टाटा प्रोजेक्ट्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले, की महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) आणि टाटा प्रोजेक्ट्स या दोन्ही मेट्रो लाइन्स इंटिग्रेटेड आहेत आणि त्या एकमेकांना पुरक आहेत.

‘दोन्ही मेट्रो मार्गांवर एकच कार्ड वापरू शकतात प्रवासी’

दोन्ही महानगरांसाठी मोबिलिटी कार्ड सारखेच असेल. दोन्ही मेट्रो मार्गांवर प्रवासी एकच कार्ड वापरू शकतात. सर्व शहरांमध्ये एकच मेट्रो कार्ड सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. मेट्रो कार्ड सर्व भारतीय शहरांमध्ये वापरले जाऊ शकते जेथे मेट्रो कार्यरत आहे, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘लोक स्वतःची वाहने चालवण्याऐवजी मेट्रोला प्राधान्य देतील’

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (PMDRA) आयुक्त राहुल महिवाल म्हणाले, की सुरुवातीच्या टप्प्यात रायडरशिप 3 लाख असेल, जी येत्या काही वर्षांत 14 ते 15 लाखांपर्यंत जाईल. वाहतूक कोंडी लक्षात घेऊन लोक स्वतःची वाहने चालवण्याऐवजी कॉरिडॉरवर मेट्रो सेवा वापरण्यास प्राधान्य देतील.