आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळाची पुणे पोलिसांकडून चौकशी होणार, सायबर विभागाकडे विद्यार्थ्यांची तक्रार

| Updated on: Nov 03, 2021 | 10:40 AM

महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड प्रवर्गातील 6205 पदांसाठी 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा पार पडली. आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया राबवण्याचं काम न्यासा या कंपनीला देण्यात आलं होतं.

आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळाची पुणे पोलिसांकडून चौकशी होणार, सायबर विभागाकडे विद्यार्थ्यांची तक्रार
HEALTH DEPARTMENT RECRUITMENT PAPER LEAK
Follow us on

पुणे: महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड प्रवर्गातील 6205 पदांसाठी 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा पार पडली. आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया राबवण्याचं काम न्यासा या कंपनीला देण्यात आलं होतं. आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. पुण्यातील एमपीएससी समन्वय समितीनं 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतवर बहिष्कार टाकण्यांचं आवाहन केलं होतं. गट क आणि गट ड च्या परीक्षेपूर्वीचं पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता एमपीएससी समन्वय समिती पुणे यांच्याकडून सायबर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे.

व्हायरल प्रश्नपत्रिकेची तपासणी सुरु

आरोग्य विभागाच्या भरतीमधील गोंधळाची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. एमपीएससी समन्वय समितीनं पुणे सायबर विभागात तक्रार देण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून फुटलेल्या व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेची तपासणी करायला सुरुवात कऱण्यात आली आहे.

चौकशी करुन गुन्हा दाखल होणार

आरोग्य विभागातर्फे 24 तारखेला गट क मधील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला होता. पेपर फुटला आणि व्हॉट्सऍपवर प्रश्नपत्रिका व्हायरल कशी झाली ? याचा सायबरकडून तपास करण्यात येत आहे. चौकशी करून भरतीतील गोंळासंदर्भात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे.

6205 पदांसाठी भरती

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. न्यासा कंपनीच्या वतीनं परीक्षेचं आयोजन 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबरला करण्यात आलं होतं.

भंडारा आणि पुण्यात पेपर फुटल्याचा आरोप

आरोग्य विभागाच्या वतीनं रविवारी 31 ऑक्टोबरला गट ड प्रवर्गातील पदांसाठी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. भंडारा आणि पुणे जिल्ह्यात परीक्षेचा पेपर एक तासाआधीच फुटला होता, असा आरोप केला गेला होता. विशेष म्हणजे तसे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत होते. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

इतर बातम्या:

परीक्षा महाराष्ट्रासाठी, सेंटर उत्तर प्रदेश ! आरोग्य विभागाच्या भरती प्रकियेचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच

Special story | देशात हलकल्लोळ, 29 गोळ्या झाडून इंदिरा गांधी यांची हत्या, त्याच दिवशी पंतप्रधानपदाचा पेच कसा सुटला?, वाचा इन्साईड स्टोरी

Pune MPSC aspirants file compliant over paper leak in Health Department group c and group d exam Cyber Police will be investigate all matter