AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा गुढ मृत्यू

पुण्यात नुकतीच MPSC परीक्षा पास उत्तीर्ण झालेल्या तरुणीचा  मृतदेह आढळलाय. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा हा मृतदेह आढळून आलाय. ती नुकतीच वन खात्याची आरएफओची परीक्षा उत्तीर्ण झाली होती.

पुण्यातून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा गुढ मृत्यू
darshana pawar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 20, 2023 | 9:12 AM
Share

विनय जगताप, वेल्हा, पुणे : पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी सकाळी एका तरुणीचा मृतदेह सापडला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. या प्रकरणी मोठ्या घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या मुलीसोबत असलेला तरुणीही बेपत्ता आहे. या प्रकाराचा तपास पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

कोणाचा होता मृतदेह

दर्शना दत्तू पवार असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती नुकतीच एमपीएससीची परीक्षा पास उत्तीर्ण झाली होती. ती हरवल्याची तक्रार १५ जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. मात्र आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मुलीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.

कधीपासून होती बेपत्ता

दर्शना ९ जून रोजी पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमासाठी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत घरच्या मंडळीच्या संपर्कात होती. मात्र १२ रोजी दर्शनाला आम्ही दिवसभर फोन करत होतो. मात्र तिने फोन उचलले नाहीत. यामुळे कुटुंबियांनी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे येऊन तिची चौकशी केली. त्यावेळी सांगण्यात आले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून त्यांनी सिंहगड रोड पोलिसात मिसिंगची तक्रार दिली.

पोलिसांना खून झाल्याचा संशय

वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सापडलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावरून तरुणीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.

संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र आठ दिवसानंतर अचानक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वेल्हे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या घटनेने नेमका खून कुठल्या कारणाने झाला याचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी