AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भीषण अपघात, भरधाव सिमेंट मिक्सर नवले पुलावर पलटी, दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाला चिरडले

पुण्याच्या नवले पूल परिसरात ९ जून २०२६ च्या मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. भरधाव सिमेंट मिक्सर दुचाकीवर पलटी झाल्याने ३१ वर्षीय रामेश्वर भोगले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून नऱ्हे पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात भीषण अपघात, भरधाव सिमेंट मिक्सर नवले पुलावर पलटी, दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाला चिरडले
pune
| Updated on: Jun 10, 2026 | 9:50 AM
Share

पुण्यातील सातत्याने अपघातांचे केंद्र ठरणाऱ्या नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री आणखी एका भीषण अपघाताची नोंद झाली. एक भरधाव सिमेंट मिक्सर पलटी होऊन थेट दुचाकीवर कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका ३१ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच चिरडून मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वाराला पळण्याची किंवा बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. रामेश्वर मच्छिंद्र भोगले (३१) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेमुळे कात्रज आणि त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.

मध्यरात्री साडेबारा वाजता घडली दुर्घटना

नऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ जून २०२६ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास नवले ब्रिजजवळील पल्स हॉस्पिटलसमोर घडली. गोरख लक्ष्मण रनसुरे (५०) हा चालक त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा सिमेंट मिक्सर (एमएच १२ आरएन २८६६) घेऊन कात्रजकडून बावधनच्या दिशेने जात होता. सिमेंट मिक्सर नवले चौक परिसरात आला असता एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

वाहन वेगात असल्याने हा अवजड मिक्सर थेट रस्त्यावर पलटी झाला. दुर्दैवाने, त्याच वेळी शेजारून आपली होंडा शाईन ही दुचाकी येत होते. बाईक घेऊन बावधनच्या दिशेने जाणारे रामेश्वर भोगले हे या मिक्सरखाली पूर्णपणे दबले गेले. जड वाहनाखाली चिरडले गेल्याने रामेश्वर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर कात्रज-देहूरोड बायपासवर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापत 

यानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या अपघातात मिक्सर चालक गोरख रनसुरे याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत रामेश्वर भोगले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

तसेच याप्रकरणी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निष्काळजीपणे, मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आणि भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला जाणार आहे. नऱ्हे पोलीस ठाण्यात ही प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नऱ्हे पोलीस करत आहेत.

Follow Us
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर