AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune NCP Agitation : ‘कमळाबाई’ची आरती करून राष्ट्रवादीनं केला वाढलेल्या महागाईचा निषेध; पुण्यातल्या शनिपार चौकात आंदोलन

महागाईच्या मुद्द्यावरून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिपार चौकातील मारुती मंदिरासमोर हे आंदोलन केले. यावेळी भाजपाचा झेंडा उलटा लावत कमळाबाई, महागाईची देवी अशा आरत्या करण्यात आल्या.

Pune NCP Agitation : 'कमळाबाई'ची आरती करून राष्ट्रवादीनं केला वाढलेल्या महागाईचा निषेध; पुण्यातल्या शनिपार चौकात आंदोलन
महागाईविरोधात राष्ट्रवादीचे शनिपार चौक, पुणे येथे आंदोलनImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 11, 2022 | 11:01 AM
Share

पुणे : वाढलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून पुण्यात पक्षातर्फे (Pune NCP Agitation) आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कमळाबाईची तसेच महागाईची देवी अशी आरती करण्यात आली. भ्रष्टाचाराचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. देशात पेट्रोल-डिझेल दरवाढ (Petrol diesel price hike) सुरूच आहे. तर गॅस सिलिंडरच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. रोजच वाढणाऱ्या इंधनाच्या दरामुळे जगायचे कसे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. केंद्र सरकारला मात्र याचे काहीच देणेघेणे नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासही त्यांना कोणताही रस नाही. तर दुसरीकडे देशात फारशी महागाई (Inflation) नसल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. अशी वक्तव्ये म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. या सर्वांचा निषेध म्हणून शनिपार चौकात हे आंदोलन करण्यात आले.

भाजपाचा झेंडा लावला उलटा

महागाईच्या मुद्द्यावरून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिपार चौकातील मारुती मंदिरासमोर हे आंदोलन केले. यावेळी भाजपाचा झेंडा उलटा लावत कमळाबाई, महागाईची देवी अशा आरत्या करण्यात आल्या. भष्टाचाराचा निषेधही करण्यात आला. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. याआधीही राष्ट्रवादीने गुडलक चौकात 29 एप्रिलला आंदोलन केले होते. यात भोंगे लावून, नरेंद्र मोदींचे जुने भाषण ऐकवण्यात आले होते. महागाई तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीचा विरोध करण्यात आला होता.

शरद पवारांनीही केली होती टीका

पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. ते सतत वाढल्यास त्याचा परिणाम फक्त वाहनचालकांना होत नाही, तर भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही त्यामुळे वाढतात. त्यामुळे इंधनाच्या किंमती कमी होणे गरजेचे आहे. मात्र केंद्रातले सरकार सामान्यांच्या या समस्यांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही, असा टोला काल शरद पवार यांनी केंद्र सरकारला लगावला होता.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....