मोठी बातमी! पुण्यात भर दुपारी गोळीबाराचा थरार; यवतमध्ये तणावाचे वातावरण, नेमकं काय घडलं?

दौंड तालुक्यातील पाटस येथे भर दुपारी गोळीबार झाले आहे. तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोचलेले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांची पथके चौकशी करत आहेत.

मोठी बातमी! पुण्यात भर दुपारी गोळीबाराचा थरार; यवतमध्ये तणावाचे वातावरण, नेमकं काय घडलं?
Pune yavat Firing News
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 05, 2026 | 5:18 PM

पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे भर दुपारी गोळीबार झाले आहे. तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोचलेले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांची पथके चौकशी करत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातून काही तरुण या ठिकाणी आले होते त्यांचा पाटस मधील तरुणांची शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भर दुपारी गोळीबार

समोर आलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) दुपारी अडीच वाजता गोळीबार झाला आहे. यवतमधील गरदडे कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानंतर जिल्ह्यातील काष्टी येथून काही तरूण आले होते, त्यांचा स्थानिक तरुणांशी वाद झाला, त्यानंतर ही घटना घडली आहे.

किरकोळ वादातून राडा

यवतमधील या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील काही तरुण पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्समध्ये आले होते. यावेळी काष्टीतील या तरूणांचा पाटसमधील काही तरुणांशी वाद झाला. या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, त्यानंतर दगडफेकही झाली. यात एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. यानंतर 3-4 राऊड फायर करण्यात आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

काही तरूण पोलिसांच्या ताब्यात

या गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. आता त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी कसरत करावी लागली. दरम्यान, गोळीबाराची ही घटना नेमकी का घडली याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. पोलिस सध्या या गोळीबाराचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

Follow Us