पुण्यात संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या 1700 जणांवर कारवाई; हॉटेल्स, मॉल्सना दणका

| Updated on: Feb 23, 2021 | 9:33 AM

आतापर्यंत शहरात 2 लाख 53हजार विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांकडून पोलिसांनी आतापर्यंत जवळपास आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. | Coronavirus pune

पुण्यात संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या 1700 जणांवर कारवाई; हॉटेल्स, मॉल्सना दणका
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे: राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई केली जात आहे. या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने अवघ्या दिवसांत जवळपास 9 लाखांचा दंड वसूल केला आहे. (Coronavirus rules not following in pune)

गेल्या दोन दिवसांत पुणे पोलिसांकडून रात्रीच्या संचारबंदींचे उल्लंघन करणाऱ्या 1700 जणांवर कारवाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, काहीजण विनाकारण रात्रीच्यावेळी रस्त्यावर फिरताना आढळून आले. अशा लोकांवर पोलिसांनी संचारबंदी उल्लंघन कलमातंर्गत गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय, विनामास्क फिरणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. आतापर्यंत शहरात 2 लाख 53हजार विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांकडून पोलिसांनी आतापर्यंत जवळपास आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पुणे मनपा अ‍ॅक्शन मोडमध्ये

शहरात सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या हॉटेल्स, मॉल्स आणि दुकानांवर पालिकेच्या पथकांकडून धडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या 568 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने तीन दिवसांत 1,55, 050 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफे, वैशाली हॉटेलचाही समावेश आहे. सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या आस्थापनांकडून पाच हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. काल रात्री (सोमवार) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.

संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडुके उगारात अनेकांना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद दिल्याचं पाहायला मिळालं. शहरांत ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलिस चौकशी करत होते.

संबंधित बातम्या:

Photo Story: मुंबईकरांचं डोकं फिरलंय का?; धोक्याचा इशारा दिल्यानंतरही क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी!

पिंपरी चिंचवडमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

नागपुरातील मंगल कार्यालयात 8 लोकं कोरोनाग्रस्त, हॉलला पोलिसांनी ठोकलं टाळं, कन्टेन्मेट झोन घोषित

(Coronavirus rules not following in pune)