
मुंबई – पुण्यातील कल्याणीनगरात एका बेफाम कार चालकाने एका पल्सर बाईकला प्रचंड वेगाने उडविल्याने त्यावर बसलेल्या तरुण आणि तरुणींचा हकनाक बळी गेल्याची घटना शनिवार 18 मे रोजी रात्री मध्यरात्री घडली. या भीषण अपघातात आलिशान महागड्या पोर्श कारचा चालक हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयाने लागलीच जामीन मंजूर केल्याने समाजात संतप्त भावना उमटल्या आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मद्य पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले होते. आरोपीने केलेला गुन्हा पाहाता त्याला सज्ञान समजून त्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यास वेळ लावल्याने पुणेकर संतप्त झाले. या प्रकरणात प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर पुणे पोलिसांना उपरती होत त्यांना आरोपी मुलगा वेदांत अगरवाल ( 17 ) याचे पालक बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. अशा प्रकारच्या ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ प्रकरणात आतापर्यंत अनेक श्रीमंत धनदांडगे पोलिसी कारवाईतून...