आधी नितीन राऊतांनी शब्द पाळावा, मग ऊर्जा खाते सोडावे, पुण्यात आंदोलन

| Updated on: Feb 10, 2021 | 12:21 PM

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आधी वाढीव वीजबिलाबाबत दिलेला शब्द पाळावा, त्यानंतर त्यांनी उर्जा खाते सोडावे अशी मागणी पुण्यात करण्यात आली. (Pune protest electricity bill Nitin Raut)

आधी नितीन राऊतांनी शब्द पाळावा, मग ऊर्जा खाते सोडावे, पुण्यात आंदोलन
आंदोलक
Follow us on

पुणे : उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin  Raut) यांनी आधी वाढीव वीजबिलाबाबत दिलेला शब्द पाळावा, त्यानंतर त्यांनी उर्जा खाते सोडावे अशी आक्रमक मागणी पुण्यात करण्यात आली. त्यासाठी पुण्यात दुकानदार व्यापारी असोसिएशनतर्फे वाघोली येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या आंदोलकांनी वाढीव विजबिलाच्या मुद्द्यावुरून सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. तसेच आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा देत राऊतांनी उर्जामंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. (Pune protest against electricity bill, demands resignation of Nitin Raut)

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन सरकार सध्या चांगलेच अडचणीत आले आहे. वीजबिलामुळे भाजप, मनसे तसेच इतर पक्षांनी सरकारला वेळोवेळी घेरले आहे. या पक्षांकडून वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे काही संघटनासुद्धा याच मुद्द्यावरुन आक्रमक झाल्या आहेत. पुण्यात आज दुकानदार व्यापारी असोसिएशनतर्फे वाघोली येथे वीजबिल माफीसाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी आधी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेला शब्द पाळावा आणि नंतर उर्जा खाते सोडावे अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली.

आंदोलकांच्या मागण्या काय?

यावेळी आंदोलन करताना आंदोलकांनी सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात आलेले छोट्या-मोठ्या व्यावसायिक, दुकानदारांचे वीजबिल माफ करावे. महावितरण कंपनी आणि ऊर्जामंत्री यांनी वीज जोडणी तोडण्यासाठी दिलेल्या 70 लाख नोटिसा परत घ्याव्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जनतेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करावी, अशा मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत.

दरम्यान, सरकारने या मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रातून ई-मेलद्वारे वीजबिलं गोळा करून त्यांची मंत्रालयासमोर होळी करण्यात येईल, असं आंदोलकांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंचा राजीनामा का घ्यावा?; चंद्रकांतदादांनी दिली देशभरातील उदाहरणं(Opens in a new browser tab)

केंद्र सरकारकडून वीजपुरवठ्यासाठी नवे नियम; जाणून घ्या सामान्य नागरिकांना काय मिळणार(Opens in a new browser tab)

आधी वीज बिल माफ करु म्हणाले, अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर नाही म्हणाले : राज ठाकरे

(Pune protest against electricity bill, demands resignation of Nitin Raut)