AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाहनांच्या झाल्या होड्या, पुराच्या पाण्यात तरंगल्या गाड्या! नव्या पुण्याचे शिल्पकार कोण? जयंत पाटलांचं खोचक उत्तर

मुसळधार पावसानंतर पुणेकर म्हणाले आता 'पुरए'! एकीकडे पुराचं पाणी ओसरलं, दुसरीकडे राजकीय आरोपांचा मुसळधार पाऊस

वाहनांच्या झाल्या होड्या, पुराच्या पाण्यात तरंगल्या गाड्या! नव्या पुण्याचे शिल्पकार कोण? जयंत पाटलांचं खोचक उत्तर
पुण्यात मुसळधार पावसाचा कहरImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 18, 2022 | 12:01 PM
Share

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे : मुसळधार पावसाने पुणेकरांची (Pune Rains) सोमवारी रात्री झोपच उडवली. पुण्यातील रात्रीच्या पुराचे व्हिडीओही (Pune Heavy Rain Video) आता समोर आलेत. धुवाँधार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. अनेक गाड्या पुराच्या पाण्यात अडकल्यात. काही गाड्या तर होडीप्रमाणे रस्त्यावरील पुराच्या पाण्यात हेलकावे खातानाही दिसल्या. रात्रीच्या मुसळधार पावसातील पुराचं पाणी आता ओसरलं. तर दुसरीकडे तुंबलेल्या पुण्याला जबाबदार कोण, यावरुन राजकारण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil on Pune rain) यांनी ट्वीट करुन नव्या पुण्याचे शिल्पकार कोण, यावरुन भाजपला टोला लगावला.

पुण्यात गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत असल्याचं जयंत पाटील यांनी ट्वीट करुन म्हटलंय. पुणे शहरामध्ये अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनल्याचाही टोला त्यांनी लगावला.

इतकंच नव्हे तर गेली पाच वर्ष पुणे पालिकेत कुणाची सत्ता आहे, याची आठवणही त्यांनी करुन दिली. पुणे महानगरपालिकेत भाजपची गेली पाच वर्ष सत्ता होती. नव्या पुण्याच्या ‘शिल्पकारांनी पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरुन वाहतोय’, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

पुण्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या दुचाकी, कार यांचे फोटोही जयंत पाटील यांनी शेअर केले आहेत. तर रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या फोटोंचा दाखलाही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिलाय. पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्त्वाच्या असणाऱ्या शहरात असं चित्र निर्माण होणं दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

एका व्हिडीओमध्ये तर दोन कार या पुराच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात असल्याचं दिसून आलं आहे. ट्वीटरवर पुण्यात आलेल्या पुराच्या पाण्याचे अनेक व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय. सरकारकडून आता या नुकसान झालेल्यांना मदतीची प्रतिक्षा आहे.

दुसरीकडे मुसळधार पावसानंतर जिल्हा प्रशासन आता सतर्क झालं आहे. पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागासह पोलीस आणि इतर यंत्रणांनाही अलर्ट करण्यात आलंय.

पुण्यात अल्का चौक, सदाशिव पेठ, शिवाजी नगर, कोंढवा, एफसी रोड, जंगली महाराज रोड, यासह अनेक सखल भागात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने दाणादाण उडवली होती. काहींनी भाजपचे लावलेले विकासपुरुष हे बॅनर ट्वीटरवर पोस्ट करत पुण्यातील पुरावर खोचक भाष्य केलंय. सोशल मीडियावर पुण्यातील पुराला जबाबदार कोण, यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.