पुण्यात निवृत्त पोलिसाच्या शेतातून रोज सहा टँकर पाणीचोरी, राष्ट्रवादीने हाकललेला माजी पदाधिकारी निघाला आरोपी

| Updated on: May 21, 2021 | 11:47 AM

आरोपी मंगलदास बांदल आणि त्याच्या भावाविरोधात सेवानिवृत्त पोलीस ज्ञानदेव तनपुरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. (Pune Retired Police Well Water Theft)

पुण्यात निवृत्त पोलिसाच्या शेतातून रोज सहा टँकर पाणीचोरी, राष्ट्रवादीने हाकललेला माजी पदाधिकारी निघाला आरोपी
आरोपी मंगलदास बांदल
Follow us on

पुणे : सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. आरोपी भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) हा राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेला माजी प्रदेश उपाध्यक्ष असल्याचं समोर आलं आहे. (Pune Retired Police Officer Farm Well Water Theft NCP expelled leader arrested)

शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी

आरोपी मंगलदास बांदल आणि त्याच्या भावाविरोधात सेवानिवृत्त पोलीस ज्ञानदेव तनपुरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. बांदल भावंडं
तनपुरेंच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करुन जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात मंगलदास बांदल आणि त्याचा भाऊ बापूसाहेब बांदल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानदेव तनपुरे यांच्या विहिरीतून बांदल आणि त्याचा भाऊ हे दररोज जबरदस्तीने सहा टँकर पाणी चोरुन नेत होते. तसेच तनपुरेंच्या मालकीची जमीन बळकावण्याचाही बांदल भावांचा प्रयत्न होता, असा तनपुरे यांचा आरोप आहे.

खंडणी प्रकरणात बांदल अडकलेला

मंगलदास बांदल हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष होता. मागच्या वर्षी एका खंडणी प्रकरणात अडकल्याने बांदलची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पुण्यातील पी. एन. गाडगीळ सराफ पेढीचे प्रमुख सौरभ गाडगीळ यांना तब्बल 50 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याने मंगलदास बांदल याची गेल्या वर्षी हकालपट्टी करण्यात आली होती. आता जमीन बळकावण्यासाठी बांदल त्रास देत असल्याची तक्रार आली आहे.

राष्ट्रवादीकडून गेल्या वर्षी कारवाई

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरु असल्याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे’ अशी घोषणा राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी 14 मार्च 2020 रोजी केली होती.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी

पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड, बिबवेवाडीत कारवर सिमेंट ब्लॉक टाकणारे दोन गुंड अटकेत

(Pune Retired Police Officer Farm Well Water Theft NCP expelled leader arrested)