Pune Sambhajiraje Chhatrapati : राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार; स्वराज्य संघटनेचीही स्थापना, संभाजीराजे छत्रपतींची पुण्यात घोषणा

| Updated on: May 12, 2022 | 12:45 PM

अनेक विषयासाठी राज्यभर दौरे केले. माझ्या दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजंचे विचार पोहोचवता आले, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. पुण्यात खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर आपली भूमिका त्यांनी मांडली.

Pune Sambhajiraje Chhatrapati : राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार; स्वराज्य संघटनेचीही स्थापना, संभाजीराजे छत्रपतींची पुण्यात घोषणा
छत्रपती संभाजीराजे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : दोन निर्णय मी घेतले आहेत. पहिला राज्यसभेचा. येत्या जुलैमध्ये सहा जागा रिक्त होणार आहेत. यावर्षीची राज्यसभेची निवडणूक लवढणार, असल्याचे ते म्हणाले. तर ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. यापुढे मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, असेही ते म्हणाले. स्वराज्य संघटनेची स्थापना करून राज्यभर दौरे करणार असल्याचेही ते म्हणाले. खासदारकीची टर्म संपल्यानंतर आता संभाजीराजे यांची राजकीय वाटचाल काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केला. त्यासोबत या निवडणुकीला अपक्ष (Independent) सामोरे जाणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. अपक्ष म्हणून माझा कोणाला सन्मान करायचा असेल तर तो त्यांचा अधिकार असेल. मात्र सध्या तरी मी अपक्ष म्हणूनच लढणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेही आभार मानले.

‘स्वराज्य संघटित करण्यावर भर’

अनेकांनी मला स्वतंत्र पक्ष काढण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर मी स्वराज्य संघटित करण्यावर भर देणार आहे. स्वराज्य ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात वावगे समजू नये, असे ते म्हणाले. या संघटनेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यभर दौरा केल्यानंतर सर्व समाजबांधवांना काय वाटते, त्यांची भावना जाणून घेऊन पुढील वाटचाल करणार आहे. दरम्यान, पक्षाचे चिन्ह आणि रंग अद्याप ठरवला नाही, असे ते म्हणाले.

मोदी, फडणवीसांचे आभार

बहूजन समाजाला जे आरक्षण मिळाले होते सांगण्याची संधी मला मिळाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्षात आल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला बोलावून विनंती केली आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावे, म्हणून मी ते पदे स्वीकारले. त्यांनी संधी दिली. त्यामुळे मी प्रथम राष्ट्रपती, पंतप्रधान महोदय, देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.