TV9 Marathi Exclusive: दीनानाथ रुग्णालयाला ससूनच्या अहवालातून ‘क्लीन चिट’? अहवालात नेमके काय-काय?
Tanisha Bhisheh death case: दीनानाथ रुग्णालय प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. त्या अहवालातील निष्कर्षानुसार मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिटच मिळण्याची शक्यता आहे. एकूण तीन समित्या या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Pune Deenanath Mangeshkar Hospital: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता, असा आरोप होत आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी विविध समित्यांकडून सुरु आहे. त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. हा अहवाल ‘टीव्ही ९ मराठी’ला मिळाला आहे. त्या अहवालातील निष्कर्षानुसार मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिटच मिळण्याची शक्यता आहे. एकूण तीन समित्या या प्रकरणाची चौकशी करत आहे.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीने अहवाल पुणे पोलिसांना दिला. या अहवालातील निष्कर्ष TV9 मराठीच्या हाती लागले आहे. त्यात काय काय म्हटले आहे पाहू या…
- इंदिरा आयव्हीएफमध्ये तब्येतीत सुधारणा होत नसताना देखील 4-5 दिवस दाखल करून घेणे चूक होती. गर्भवती महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट झालेले असताना तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवायला हवे होते. या सगळ्यात आयव्हीएफ सेंटरची जबाबदारी महत्वाची आहे. त्यांनी लवकर रुग्णास दुसरीकडे पाठवणे गरजेचे होते.
- तनिषा भिसे यांना मंगेशकर रुग्णालयात पाच तास थांबवले होते. मात्र या वेळी पैसे घेतले की नाही? किंवा हेच कारण होते का? पैसे द्या नाहीतर ट्रीटमेंट करणार नाही, असे प्रश्न होते. याबाबत आरोग्य उपसंचालक यांनी चौकशी करून अहवाल द्यायचा आहे. त्याची चौकशी आरोग्य उपसंचालक यांनी केली आहे.
- अती जोखमीची परिस्थिती असताना मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये तनिषा भिसे यांना नेण्याची गरज होती. मात्र ते करण्यात आले नाही. त्या महिलेस सूर्या रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी प्रसृती झाली. मात्र रुग्णालयात कोणताही कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नव्हता. त्या महिलेस ह्रदयविकाराच्या धोका वाढला होता. त्यामुळे जवळपास दोन तास सीपीआर दिले जात होते.
- गर्भवती महिला गुंतागुंतीचे रुग्ण होता. मृत्यू मणिपालमध्ये झाला. हा माता मृत्यू असतानाही त्यांनी शवविच्छेदन केलेले नाही. ससून रुग्णालयाला त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणे गरजेचे होते. हे झालेले नाही.
