Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर, पुणे गोळीबार प्रकरणाचा तपास फास्टट्रॅकवर, अपडेट काय?
Sunetra Pawar Pune Police Meeting: पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा कोर्ट परिसरात आरोपीवर गोळीबार आणि कोयत्याने वार केल्याचा थरार घडला. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर आल्या आहेत. आता याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Sunetra Pawar Pune Police Meeting: पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा कोर्ट परिसरात आरोपीवर गोळीबार आणि कोयत्याने वार केल्याचा थरार घडला. या घटनेने पुण्यातील वाढती गुन्हेगारीवरून विरोधकांनी एकच हल्लाबोल केला. कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा सवाल उपस्थित करण्यात आला. सातत्याने गुन्हेगारी घटना घडत असल्याने नेते चिंता व्यक्त करत असतानाच ही भयावह घटना घडली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर आल्या आहेत. त्यांनी याप्रकरणाचा तपास फास्टट्रॅकवर करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे.
सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर..
विरोधकांनीच नाही तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट बाहेर झालेल्या गोळीबार आणि हल्ला प्रकरणानंतर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर आल्या आहेत. पुणे पोलिसांची तातडीने बैठक बोलावली आहे. पोलीस आयुक्त अमिततेश कुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
प्रकरणाची फास्टट्रॅकवर तपास
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलिसांसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. “आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी दुर्दैवी घटना घडली. त्यासाठी मी पुण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड विभाग पोलीस आयुक्त आणि पोलिस यांची आढावा बैठक घेतली आहे. या गुन्ह्यासंदर्भात आणि इतर संबंधात विचारणा केली. सहा आरोपींना पकडले आहे. तीन आरोपींचा शोध सुरू आहे. फास्टट्रॅकवरती या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहे.” अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली.
अगोदर टीका नंतर माफी
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचावर काल टीका केली होती. सुनेत्रा वहिनींना अजितदादांसारखे काम येत नाही. सुनेत्रा पवारांना पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करता येईल असे वाटत नाही. पुण्याला कठोर पालकमंत्री द्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी व्यक्तिगत दिलगिरीही व्यक्त केली. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी पुण्याचा पालकमंत्री बदलण्याची मागणी केली होती. आज माध्यमांशी बोलताना हा वाद न वाढवण्याची भूमिका घेत त्यांनी सुनेत्रा पवार यांची माफी मागते असे म्हटले. तर पुण्यातील गुन्हेगारीविषयी मोठ्या कारवाईची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर पुणे पोलिसांवर नाराजी व्यक्त केल्याचेही समोर आले. तर आज सुनेत्रा पवार यांनी पोलिसांची बैठक घेत जलद तपासाचे आदेश दिले.