AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याच्या जुई केसकरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, पार्किन्सनवरील उपकरणासाठी गौरव

जुई केसकरने ‘JTumour 3-D’ हे पार्किन्सन आजाराने ग्रस्त रुग्णांना परिधान करता येणारे उपकरण विकसित केले. (Pune Student Parkinson’s disease )

पुण्याच्या जुई केसकरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, पार्किन्सनवरील उपकरणासाठी गौरव
| Updated on: Jan 26, 2021 | 10:54 AM
Share

पुणे : पार्किन्सन (Parkinson’s Disease) म्हणजेच कंपवातावर मात करण्यासाठी उपकरणाची निर्मिती करणाऱ्या पुण्याच्या विद्यार्थिनीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. पुणे शहरात राहणारी जुई केसकर (Jui Keskar) ‘आयरिस’ (IRIS – Initiative for Research and Innovation for STEM) स्पर्धेच्या वीस विजेत्यांपैकी एक ठरली आहे. आता ‘आयएसईएफ’ (Regeneron International Science and Engineering Fair – ISEF) या अमेरिकेत भरवल्या जाणाऱ्या विज्ञान आणि अभियांत्रिकी प्रदर्शनात जुई भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. (Pune Student Jui Keskar wearable device for Parkinson’s disease bags prize in IRIS National Fair)

‘पार्किन्सन’ रुग्णांसाठी उपकरणाचा शोध

जुई केसकर ही पुण्यातील ऑर्किड स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. ‘JTumour 3-D’ हे पार्किन्सन आजाराने ग्रस्त रुग्णांना परिधान करता येणारे उपकरण तिने तयार आणि विकसित केले. त्यामुळे कंपवाताचे झटके रिअल टाईममध्ये मॉनिटर करता येणे शक्य होणार आहे.

काकाचा त्रास पाहून जुई प्रेरित

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित तीन दिवसीय ऑनलाईन स्पर्धेत जुईने हे उपकरण सादर केले. कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात जुईने या उपकरणाची तयारी केली. जुईच्या काकांना कंपवाताचा त्रास असल्याने तिला अधिक तळमळ होती. त्यामुळेच काकांसह पार्किन्सनचा त्रास असलेल्या तमाम रुग्णांसाठी या उपकरणाची निर्मिती करण्याची प्रेरणा तिला मिळाली.

पार्किन्सनमध्ये काय त्रास?

पार्किन्सनमुळे व्यक्तीच्या हालचाली, बोलणं, स्मृती अशा गोष्टींवर परिणाम दिसून येतो. पार्किन्सनच्या रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता कमी असते आणि त्यांचे श्वसनाचे स्नायू आणि घशाचे स्नायू यामध्ये कडकपणा असतो.

विजेत्या विद्यार्थ्यांच्या नावे ग्रहं

इयत्ता नववी आणि अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प आणि अभिनव संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयरिसने व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा दिला जातो. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या विजेत्यांची नावं ग्रहांना दिली जातात. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील लिंकन लॅबोरेटरीजने यासाठी पाठबळ दिलं आहे. आतापर्यंत 31 भारतीयांची नावं अंतराळातील ग्रहांना देण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या :

Parkinsons Day : कंपवाताच्या रुग्णांनी ‘कोरोना’ प्रादुर्भावापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी?

(Pune Student Jui Keskar wearable device for Parkinson’s disease bags prize in IRIS National Fair)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.