AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे अत्याचाराप्रकरणी आरोपीची सुरक्षा महत्त्वाची, आमचं काय?; कोर्टाबाहेर महिला आक्रमक

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात ७२ तासांनंतर आरोपी दत्तात्रय गाडेची अटक झाली आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी त्याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पुणे अत्याचाराप्रकरणी आरोपीची सुरक्षा महत्त्वाची, आमचं काय?; कोर्टाबाहेर महिला आक्रमक
pune women angry
| Updated on: Feb 28, 2025 | 6:06 PM
Share

पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तब्बल 72 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या. मध्यरात्रीच्या अंधारात पोलिसांनी त्याला अटक केली. दत्ता गावातच असल्याची टिप मिळाली होती. तो शेताच्या दिशेने गेल्याचंही पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याला चारही बाजूने घेरण्यात आले आणि अखेर दत्तात्रय गाडेने शरणागती पत्करली. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आता पुणे कोर्टाबाहेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याला कोर्टात घेऊन जाण्यासाठी पुणे पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आरोपीला ज्या वाहनातून घेऊन जाणार आहे, त्या वाहनाच्या मागेपुढे पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या असणार आहे. आरोपीला कोर्टात घेऊन जाण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी लष्कर पोलीस ठाण्यात आले आहेत. काही वेळात आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यातून शिवाजीनगर कोर्टात घेऊन जाण्यात येणार आहे. यावेळी पिंजरा वाहनासह आरोपीला ज्या वाहनातून घेऊन जाणार आहेत त्या वाहनाच्या पुढे मागे पोलिसांच्या गाड्या असतील, अशी माहिती समोर आली आहे.

आरोपीची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि आमच्या सुरक्षेचे काय?

पुण्यात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला देण्यात येणाऱ्या सुरक्षेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात महिलांचा जमाव पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या महिलांना आरोपीच्या सुरक्षेसाठी तुम्ही इथे थांबू शकत नाही, असे सांगितले. त्यावरुन या महिलांनी आरोपीची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि आमच्या सुरक्षेचे काय? आम्हाला पोलीस या ठिकाणावरुन जायला सांगतात, पोलीस आम्हाला पोलीस स्टेशनला नेतात, पण यामागचे कारण काही नाही, असा सवाल महिला पदाधिकाऱ्यांनी केला.

आक्रमक महिला पोलिसांच्या ताब्यात

आरोपीला इतका बंदोबस्त दिलेला आहे. त्याला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. आरोपीच्या सुरक्षेसाठी आम्हाला इथून हाकललं जात आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. दिवसाढवळ्या आमच्या महिला भगिनींवर अत्याचार होत असेल तर आम्ही काय करायचं? आम्हाला या विषयाचे गांभीर्य आहे, म्हणूनच दुपारपासून आम्ही इथे उभे आहोत. गेले ७ तास आम्ही उभे आहोत. अजूनही आरोपीला इथे आणलेले नाही. आम्हाला पुण्यात अजिबात सुरक्षित वाटत नाही. सकाळी ६ वाजता बाहेर पडल्यानंतरही आम्हाला काहीतरी घडेल अशी सतत भीती वाटेत. नक्कीच फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, असा आक्रमक पावित्रा या महिलांनी घेतला. यानंतर त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.