Pune Weather | पुण्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान घरसलं, उद्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता

| Updated on: Aug 18, 2021 | 4:29 PM

उद्या पुण्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. दिवसभरात पावसाच्या एक दोन सरींचा शिडकावा होऊ शकतो. दिवसभरात ६.३ मिमी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Pune Weather | पुण्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान घरसलं, उद्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता
प्रतिकात्मक छायाचित्र
Follow us on

पुणे : पुणे (Pune) शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा तापमान कमी नोंदवण्यात आलं आहे. १८ ऑगस्ट (बुधवारी) पुण्याचं (Pune Weather) सरासरी कमाल तापमान २६.१ अंश असणार आहे. ढगाळ वातावरणामुळे शहराच्या अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरात गेल्या २४ तासांत स्थिर परंतु हलका तीव्रतेचा पाऊस झाला. यामध्ये लोहेगाव – 6.3 मिमी, शिवाजीनगर – 2.6 मिमी आणि पाषाणमध्ये – 1.2 मिमी पाऊस नोंदवला गेला. (Pune weather report says that it will rain in Pune tomorrow)

आज पुण्यातला हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) समाधानकारक असून त्याची आकडेवारी ४० एवढी आहे.

उद्या पुण्यात पावसाची शक्यता

उद्याही (१९ ऑगस्ट) पुण्यात ९३ टक्के आकाश हे मेघच्छादित असणार आहे. म्हणजे उद्याही पुण्यातलं वातावरण ढगाळ स्वरूपाचं असेल. उद्या कमाल तापमान २९ अंश असणार आहे तर पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग १५ किमी प्रतितास असेल. उद्या पुण्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. दिवसभरात पावसाच्या एक दोन सरींचा शिडकावा होऊ शकतो. दिवसभरात ६.३ मिमी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

येत्या २-३ दिवसांत राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. त्यानुसार पुणे आणि परिसरातही पुढच्या काही दिवसांत पावसातचा इशारा वेधशाळेने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा सध्या ओडिशाजवळ आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, पश्चिम किनारपट्टीहून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, आता दुसऱ्या टप्प्याचंही नियोजन सुरू, महामेट्रो तयार करणार 82.5 किमी मेट्रोचा आराखडा

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत पोलखोल स्पर्धा! विकासकामांवरुन आरोपांच्या फैरी

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ११ वी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ५३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रक्रियेबाबत एकही तक्रार नाही!