Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, आता दुसऱ्या टप्प्याचंही नियोजन सुरू, महामेट्रो तयार करणार 82.5 किमी मेट्रोचा आराखडा

पुण्यात पहिल्या टप्प्यातली मेट्रो हळूहळू रुळावर येत आहे. त्यात आता महामेट्रोकडून (MahaMetro) पुण्यात दुसऱ्या टप्प्यातल्या मेट्रोचं नियोजनही सुरू झालं आहे.

Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, आता दुसऱ्या टप्प्याचंही नियोजन सुरू, महामेट्रो तयार करणार 82.5 किमी मेट्रोचा आराखडा

पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) प्रकल्पाच्या वनाज ते रामवाडी (Vanaj to Ramwadi) मार्गावरच्या वनाज ते आयडियल कॉलनीदरम्यानच्या मेट्रोची ट्रायल रन (Metro Trail Run) काही दिवसांपूर्वीच पार पडली. या मार्गासह स्वारगेट-पिंपरी-चिंचवड या मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पुण्यात पहिल्या टप्प्यातली मेट्रो हळूहळू रुळावर येत आहे. त्यात आता महामेट्रोकडून (MahaMetro) पुण्यात दुसऱ्या टप्प्यातल्या मेट्रोचं नियोजनही सुरू झालं आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात लवकरच मेट्रोचं मोठं जाळं पाहायला मिळणार आहे. (MahaMetro has started planning for the second phase of Metro in Pune)

महामेट्रो तयार करणार विस्तारित आराखडा

पुणे आणि परिसरात दुसऱ्या टप्प्यात ८२.२ किमीचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं नियोजन सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी शहरातल्या ८ वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रोसह लाइट मेट्रो आणि मोनोरेल प्रकल्प राबवण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे. महामेट्रोकडून यासंदर्भातला सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च केंद्र आणि राज्य सरकारनं प्रत्येकी ५० टक्के करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याला पुढच्या आठवड्यात निर्णय होणार आहे.

हे आहेत प्रस्तावित मेट्रो मार्ग

वनाज ते चांदणी चौक – १.५ किमी
रामवाडी ते वाघोली – १२ किमी
हडपसर ते खराडी – ५ किमी
स्वारगेट ते हडपसर – ७ किमी
खडकवासला ते स्वारगेट – ८ किमी
एसएनडीटी ते वारजे – १३ किमी
एचसीएमटीआर मार्ग – ३६ किमी

वर्तुळाकार मार्गावर मेट्रोची चाचपणी

पुणे शहरात वर्तुळाकार एचसीएमटीआर मार्गावर निओ मेट्रो प्रकल्प राबवण्याचं नियोजन सुरू आहे. त्यासाठी अनेकजण आग्रही असल्याचं समजतंय. त्यामुळे महामेट्रोकडून या ३६ किमी मार्गावर महामेट्रोकडून निओ मेट्रोचा आराखडा तयार केला जाणार आहे.

लवकरच प्रवासी सेवेला सुरूवात

३० जुलैला वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. ३ डब्यांच्या २ मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्याची महामेट्रोचा विचार आहे. (Mahametro has started planning for the second phase of Metro in Pune)

संंबंधित बातम्या :

Pune Metro | अजित पवारांकडून पुणे मेट्रोला हिरवा झेंडा, ड्रोनमधून पाहा पुण्याची मेट्रो

अजितदादांचा पुणे मेट्रोला हिरवा झेंडा, वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पहिली ट्रायल रन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI