AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Weather | पुण्यावर आज ढगांचं अच्छादन कायम, दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता

पुणे (Pune) आणि परिसरात गेले 2-3 दिवसांपासून कायम असणारी ढगाळ वातावरणाची स्थिती आजही कायम राहणार आहे. आज दुपारनंतर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी (Pune Rain) कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Pune Weather | पुण्यावर आज ढगांचं अच्छादन कायम, दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता
weather
| Edited By: Ajinkya Guthe | Updated on: Sep 02, 2021 | 10:33 AM
Share

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात वाऱ्याची स्थिती काही प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे पुणे (Pune) आणि परिसरात गेले 2-3 दिवसांपासून कायम असणारी ढगाळ वातावरणाची स्थिती आजही कायम राहणार आहे. आज दुपारनंतर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी (Pune Rain) कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल शहरात सकाळपासूनच आभाळी वातावरण होतं. शिवाजीनगर वेधशाळेत काल सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 1.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात आतापर्यंत 387.3 मिमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (The meteorological department has forecast light showers in Pune today)

पुढच्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. आज कोकणातल्या पालघरसह विदर्भात बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात 110 टक्के पावसाचा अंदाज

देशभरात सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 110 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरात सप्टेंबर महिन्यात सरासरी 170 मिमी पावसाची नोंद होते. त्यापेक्षा यंदा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात सरासरीइतका तर काही भागात कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरी पाऊस

पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरी पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातल्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक किंवा सरासरीएवढा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्याच्या काही भागात मात्र, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

जून ते ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पाऊस

देशभरात जून ते ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पाऊस झाला आहे. या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 टक्के अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे. कोकण 12 टक्के, मध्य महाराष्ट्र 5 टक्के आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या 20 टक्के जास्त पाऊस झाला आहे. विदर्भात मात्र, सरासरीच्या१४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

इतर बातम्या :

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दररोज 7 रुपये गुंतवा, दरमहा 5000 कमवा, नेमकी योजना काय?

पायल रोहतगीच्या वकिलाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर नाकारला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

उस्मानाबादमध्ये कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’, गरोदर मातांसह लहान मुलांवर विशेष लक्ष 

Follow Us
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर