AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी

पुणे शहरातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हणामारी झाली. गेल्या वर्षी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडण प्रकरणातील हे कैदी आहेत. त्यांना न्यायालयीन कैदी किशोर विभागात ठेवण्यात आले होते. या आरोपीचे इतर कैद्यांशी भांडण झाले अन् त्यानंतर हाणामारी.

पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी
प्रेमप्रकरणातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9 Network
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 02, 2023 | 2:34 PM
Share

पुणे : कारागृह कैद्यांसाठी सुरक्षीत राहिले नाही का? हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती पुणे येथील येरवडा कारागृहात झाली. या ठिकाणी कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन जण जखमीसुद्धा झाले आहेत. जखमींवर लागलीच उपचार करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  कैद्यांनी मिळेल ते साहित्य हातात घेऊन हाणामारी केली. हा प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक २च्या जवळील हौदाजवळ घडला.

नेमके काय झाले

गेल्या वर्षी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडण प्रकरणात काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयीन कैदी किशोर विभागात ठेवण्यात आले आहे. या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. या आरोपींची इतर कैद्यांशी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे याच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. हे कारागृह शिपायांना समजल्यानंतर त्यांनी दोघांना बाजूला नेले. दोघांवर उपचार करण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृह असते हाऊसफुल

राज्यातलं सर्वात जुनं आणि मोठं कारागृह अशी ओळख असलेलं पुण्यातलं येरवडा मध्यवर्ती कारागृह नेहमी हाऊसफुल्ल असते. येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आलंले असते. जन्मठेप किंवा इतर दीर्घ शिक्षा झालेल्या कैद्यांना येरवडामध्ये ठेवलं जातं. यामध्ये खून खटल्यात शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल चोरीच्या गुन्ह्यात कैदेत असलेल्यांची संख्या आहे.

ऐतिहासिक महत्व

येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्वसुद्ध आहे. कारण या कारगृहात स्वातंत्रपूर्व काळात महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल आणि मोतीलाल नेहरू यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांना कैदी म्हणून ठेवले होते .निवडणूक जागांच्या आरक्षणावर ऐतिहासिक ‘पुणे करार’ 1932मध्ये येरवडा तुरुंगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला होता. ते ठिकाण तसेच हँगिंग बॅरॅकदेखील या ठिकाणी आहे. पुण्याचे ब्रिटीश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांच्या हत्येप्रकरणी चाफेकर बंधूंना या बराकीत फाशी देण्यात आली होती.

हे ही वाचा

तुमच्यासारख्या देशातील 67 कोटी लोकांचा डेटा चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...