तिसऱ्या आघाडीने काही फरक पडत नाही, येणार तर मोदीच-रामदास आठवले

| Updated on: Feb 20, 2022 | 7:28 PM

तेलगंणाचे सीएम केसीआर महाराष्ट्रात येऊन आपले सीएम उद्धव ठाकरे यांना भेटले आणि त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली तरी एनडीएला काहीही फरक पडणार नाही, केंद्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएच सत्तेत येणार, अशी प्रतिक्रिया या भेटीवर रामदास आठवले यांनी दिली आहे.

तिसऱ्या आघाडीने काही फरक पडत नाही, येणार तर मोदीच-रामदास आठवले
रशिया युक्रेन युद्धावर आठवलेंची कविता
Follow us on

पुणे : आज राज्याच्या राजकारणात मोठ्या घाडमोडी घडल्या आहेत. सकाळपासून चर्चा आहे ती फक्त राव (KCR) आणि महाराष्ट्र भेटींची. आधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री ठाकरेंना (Cm Uddhav Thackeray) भेटले, त्यानंतर त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट घेतली. त्यानंतर देशात तिसरी आघाडी तगडी होताना दिसत असतानाच रामदास आठवलेंनी मात्र यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तेलगंणाचे सीएम केसीआर महाराष्ट्रात येऊन आपले सीएम उद्धव ठाकरे यांना भेटले आणि त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली तरी एनडीएला काहीही फरक पडणार नाही, केंद्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएच सत्तेत येणार, अशी प्रतिक्रिया या भेटीवर रामदास आठवले यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा येणार तर मोदीच या नाऱ्यावर आठवले ठाम असल्याचे दिसून येत आहेत.

तिसऱ्या आघाडीने काही फरक पडत नाही

या भेटीबद्दल बोलताना, केसीआर यांचं प्रभावक्षेत्र फक्त तेलंगाना पुरतंच मर्यादित आहे. तिसऱ्या आघाडीसाठी त्यांनी राजकीय पुढाकार घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असा टोला आठवलेंनी लगावला आहे. तर महाराष्ट्रातील राऊत विरुद्ध सोमय्या वादावर बोलताना, ही राजकीय चिखलफेक दूर्दैवी असून ती थांबली पाहिजे, यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, राजकारणात आरोप केले पाहिजेत, पण भाषा योग्य वापरावी. मला संधी मिळाली तर मी यावर मुख्यमंत्र्यांशी बोलेल, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली आहेत. दुसरीकडे मात्र हा वाद वाढतच चालला आहे. कारण आज संजय राऊतांनी शिवराळ शब्दात टीका केल्यानंतर उद्या किरीट सोमय्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे उद्या या वादाचा नवा अंक ओपन होण्याची शक्यता आहे.

सेना-भाजपने पुन्हा एकत्र यावे

तर पहिल्यापासून भाजप आणि शिवसेने पुन्हा एकत्र यावं असे आठवले वारंवर बोलून दाखवत आहेत. आज पुन्हा आठवलेंनी तसेच विधान केले आहे. सेना – भाजपने आपसातलं राजकीय वैर विसरून पुन्हा एकत्र यावं. दोस्त दोस्त ना राहा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, सेना -राष्ट्रवादी एकत्र आले, मग परत सेना-भाजप एकत्र यायला हवेत, अशी इच्छा आठवलेंनी पुन्हा व्यक्त केली आहे. तसेच पुणे महापालिका निवडणुकीत आम्ही 20-25 जागांची मागणी केलीये. त्यापैकी 15-20 जागा आमच्या येतील, असेही आठवलेंनी सांगितले आहे, मात्र भाजप आठवलेंना किती जागा देतं हे लवकरच कळेल.

Amit Thackeray | नवी मुंबईत मनसेच्या 3 नव्या शाखा, उद्घाटनासाठी अमित ठाकरेंची हजेरी!

नव्या आघाडीचा लवकरच बारामतीतून एल्गार, भाजपला टक्कर देण्याचा प्लॅन काय?

Video | कानगोष्ट माईकने ऐकली! ‘नो क्वेशन आन्सर’ म्हणण्याची दुसऱ्यांदा वेळ का आली? लोकांचा राऊतांना सवाल