महाविकास आघाडी सरकारला घालवायचं हाच संकल्प,रामदास आठवलेंचा अनोखा मानस

| Updated on: Jan 01, 2022 | 2:59 PM

महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचं हा नवा वर्षाचा संकल्प असल्याचं रामदास आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवायची आहे, असंही रामदास आठवलेंनी सांगितलंय.

महाविकास आघाडी सरकारला घालवायचं हाच संकल्प,रामदास आठवलेंचा अनोखा मानस
ramdas athawale
Follow us on

पुणे: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचं हा नवा वर्षाचा संकल्प असल्याचं रामदास आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवायची आहे, असंही रामदास आठवलेंनी सांगितलंय.

रामदास आठवले कोरेगाव भीमामध्ये

कोरेगाव भीमाला मी भेट दिली आहे. आमच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. शौर्यदिन आहे. नवीन वर्षाचा हा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवणं आहे. रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं हा देखील संकल्प असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकार घालवायचं

आज मला झालाय फार हर्ष कारण आमच्या समोर उभं आहे 2022 चं वर्ष असं रामदास आठवले म्हणाले. रामदास आठवले यांनी राज्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार घालवायचं हा संकल्प असल्याचं सांगितलं.

2022 मध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणार

रामदास आठवले यांनी 2022 मध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं हा देखील एक संकल्प असल्याचं म्हटलं आहे.

जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत इथ येणार, चंद्रशेखर आझाद

जसे जगण्यासाठी श्वासाची गरज लागते, तसं नव्या वर्षाच्या सुरवातीला येथे यावे लागते. जो पर्यंत जिवंत आहे तो पर्य़ंत येथे येत राहणार असल्याचं चंद्रशेखर आझाद म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांसाठी काम केलं. 2018 मध्ये घडलेली घटना दुखद होती. पण 2018 मधल्या केसेस पेंडींग आहेत. सरकार त्याबाबत काही करत नाही. पुढील काळात सरकारनं काही केल नाही तर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा देखील चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे. यावेळी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली. मास्क आणि नियमांचा कार्यकर्त्यांना विसर पडल्याचंही दिसून आलं.

इतर बातम्या

Irfan Pathan: 10 वर्षाने लहान असलेल्या पत्नीसोबत इरफान पठाने शेअर केला रोमँटिक फोटो, कॅप्शनमध्ये लिहिलं…..

Narayan Rane | भेदरलेला वाघ, राणेंच्या हातात शेपटी; नेटकऱ्यांचा रोख शिवसेनेकडे, व्हायरल फोटोमध्ये नेमकं काय ?

Ramdas Athawale slam Thackeray Government on the first day of year said work for remove Thackeray government from power