Irfan Pathan: 10 वर्षाने लहान असलेल्या पत्नीसोबत इरफान पठाने शेअर केला रोमँटिक फोटो, कॅप्शनमध्ये लिहिलं…..

Irfan Pathan: 10 वर्षाने लहान असलेल्या पत्नीसोबत इरफान पठाने शेअर केला रोमँटिक फोटो, कॅप्शनमध्ये लिहिलं.....

इरफानची पत्नी सफा त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. वर्ष 2016 मध्ये मक्कात दोघांचा निकाह झाला होता. खूप जवळचे मित्र आणि नातेवाईक या निकाह सोहळ्यात सहभागी झाले होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 01, 2022 | 2:44 PM

नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठान (Irfan Pathan) अलीकडेच दुसऱ्यांदा पिता बनला आहे. मागच्यावर्षी 28 डिसेंबरला इरफानची पत्नी सफा बेगने एका गोंडस मुलाला जन्म दिला. इरफान पठानने आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदवार्ता शेअर करताना मुलाचे नाव सुलेमान खान ठेवल्याची माहिती दिली. इरफानच्या मोठ्या मुलाचं नाव इम्रान खान पठान आहे. इम्रानचा जन्म 2016 मध्ये झाला होता. (Former India All rounder Irfan pathan Share romantic Photo with wife safa baig & Wirte message with it)

माझी पत्नी, माझ्या मुलांची आई आहेस तू...
इरफान पठानने आता त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करताना स्त्री शक्तीचे महत्त्व सांगितले आहे. “माझी पत्नी, माझ्या मुलांची आई आहे. तू शक्तीचं प्रतीक आहे, आय लव्ह यू” असे इरफानने लिहिले आहे. इरफानची पत्नी सफा त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. वर्ष 2016 मध्ये मक्कात दोघांचा निकाह झाला होता. खूप जवळचे मित्र आणि नातेवाईक या निकाह सोहळ्यात सहभागी झाले होते. सफा बेगचं कुटुंब मूळचं हैदराबादचं आहे. पण तिचे पिता मिर्जा फारुख बेग बिझनेससाठी म्हणून सौदी अरेबियाला गेले होते.

इरफान पठानच्या कसोटीत 1105 धावा
2003 ते 2008 दरम्यान इरफान पठाण भारतासाठी 29 कसोटी सामने खेळला. यात त्याने 31.57 च्या सरासरीने 1105 धावा केल्या व 100 विकेट काढल्या. कसोटी क्रिकेट खेळताना सातवेळा पाच विकेट घेतल्या, तर दोनवेळा 10 विकेट काढल्या.

इरफान भारताकडून खेळला 120 वनडे
इरफान पठान भारताकडून 120 वनडे आणि 24 टी-20 सामने खेळला आहे. पाच अर्धशतकांसह इरफानने वनडेमध्ये 1544 धावा केल्या व 173 विकेट घेतल्या. टी-20 मध्ये इरफानने 28 विकेट काढल्या व 172 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर इरफान आता समालोचकाच्या भूमिकेत आहे. त्याशिवाय इरफानने जम्मू-काश्मीरच्या संघाला प्रशिक्षणही दिले आहे. उमरान मलिक, अब्दुल समद या युवा खेळाडूंना घडवण्यात इरफान पठाणची महत्त्वाची भूमिका आहे.

संबंधित बातम्या:

5 वनडेत 4 शतकं, ऋतुराज गायकवाड टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी करेल; निवड समितीला विश्वास
3 महिन्यात 4 कॅप्टन बदलले, तरीही टीम इंडियाचा विजयरथ सुस्साट
IND vs SA: सेंच्युरियन कसोटी जिंकूनही भारतासाठी एक वाईट बातमी

(Former India All rounder Irfan pathan Share romantic Photo with wife safa baig & Wirte message with it)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें