त्या नवनाथला सांग तुझ्या आयच्या XXX… राणा सूर्यवंशी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल; कुणाला धमकावलं?

पुण्यातील वादग्रस्त उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची सचिन भोईटे यांना दमदाटी करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये सूर्यवंशी शिवीगाळ करत असून नवनाथ नावाच्या व्यक्तीला धमकावताना दिसत आहेत. या व्हायरल क्लिपने मोठी खळबळ उडवली आहे.

त्या नवनाथला सांग तुझ्या आयच्या XXX... राणा सूर्यवंशी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल; कुणाला धमकावलं?
Rana Suryavanshi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 12:00 PM

पुण्यातील वादग्रस्त उद्योगपती राणा सूर्यवंशी यांचा सचिन भोईटे या व्यक्तीला दमबाजी करतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. माझा फोन रेकॉर्ड कर म्हणत शिवीगाळ केल्याची राणा सूर्यवंशी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये सूर्यवंशी आणि भोईटे यांचं संभाषण आहे. त्यात सूर्यवंशी हे नवनाथ नावाच्या व्यक्तीला दमबाजी करत शिवीगाळ करतानाही दिसत आहेत. ही क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. तसेच, राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवर हल्ला केल्याचा बनाव रचल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.

क्लिपमधील संवाद काय?

राणा सूर्यवंशी : त्या नवनाथला सांग तुझ्या आयच्या XXX. काय करायचं ते कर. मंत्र्याकडे जा, नाही तर कुणाकडे जा. इथून पुढे मी करेन सगळं. सांग त्या भैंXXX.

Loading...

सचिन भोईटे : मी काय रानातच आहे.

राणा सूर्यवंशी : तुला काय उपटायचं ते उपट. पहिल्या दिवसापासून सांगितलं मध्ये पडू नको.

सचिन भोईटे : मी काय केलं?

राणा सूर्यवंशी : तुझ्या भावाला आणि तुला लयच पडलंय केसचं आयXX.

सचिन भोईटे : पण आम्ही काहीच केलं नाही. आम्ही घरीच आहोत सगळे. आम्ही कुठे गेलो नाही? आम्ही घरीच आहोत.

राणा सूर्यवंशी : तुम्ही घेतली होती ना जबाबदारी? तो परत काही बोलणार नाही, काही नाही म्हणाला होता ना?

सचिन भोईटे : हो, पण आठ दिवस म्हटलं होतं… पण ते काय करणार ते आम्हालाच विचारूनच करणार का?

राणा सूर्यवंशी : तुला विचारून करणार नाही तर मग कशाला जबाबदारी घेतो तू?

सचिन भोईटे : अहो दादा, आम्ही सामान्य माणसं आहोत. आम्ही काय करणार सांगा बरं?

राणा सूर्यवंशी : सामान्य तर सामान्यच राहायचं ना? कशाला पडायचं या गोष्टीमध्ये? दादा जाऊ द्या… हे करा अन् ते करा… हे करणार नाही, ते करणार नाही…

सचिन भोईटे : परत कोणी काही म्हटलं नाही. आमचा भाऊ आणि आम्ही काही गेलो नाही कुठं?

राणा सूर्यवंशी : निरोप दे त्यांना फोन करून.

सचिन भोईटे : त्यांना कसं सांगणार आता? तुमचं तुम्ही बघा आता.

राणा सूर्यवंशी : सर्व गोष्टी मला सांगत होता ना?

सचिन भोईटे : तुमचं आणि माझे चांगले संबंध होते म्हणून बोलायचो. या प्रकरणाशी माझा तरी काय संबंध आहे? बरोबर आहे की नाही दादा?

राणा सूर्यवंशी : त्याला लय दात आलेत ना? XXX

सचिन भोईटे : झालं काय? मला सांगाल की नाही तुम्ही?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us