Ravindra Dhangekar : चंद्राकांत दादांना लक्ष्य करताना रवींद्र धंगेकर यांचा समीर पाटीलबद्दल मोठा गौप्यस्फोट

Ravindra Dhangekar : "मी 30-40 वर्ष सामाजिक जीवनात काम करतोय.पुणेकरांमध्ये अनेकदा जावं लागतं. पुण्यावर संकट असेल, पुण्यात सर्वसामान्यांना जगता येत नसेल, तर ती तुमची-आमची सर्वांची जबाबदारी आहे" असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

Ravindra Dhangekar : चंद्राकांत दादांना लक्ष्य करताना रवींद्र धंगेकर यांचा समीर पाटीलबद्दल मोठा गौप्यस्फोट
Ravindra Dhangekar
| Updated on: Oct 13, 2025 | 11:51 AM

“निलेश घायवळ प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत,जे आजबाजूला सपोर्टिंगला आहेत, ज्यांच्यामुळे वर्षानुवर्ष कोथरुड परिसरात गुन्हेगारी वाढतेय, त्यावर मी बोलत होतो. माझा साधा प्रश्न होता निलेश घायवळ टोळीचे लोक दादांच्या आजूबाजूला असतात. त्याचा त्यांनी खुलासा करावा. पुणे भयमुक्त व्हावं हा माझा विषय होता” असं पुणे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर म्हणाले. “पासपोर्टमध्ये फेरफार केला, आज पोलिसांची नाचक्की झाली. आपण बघत असाल तर इंटरपोल सारख्या संस्थेला पुणे पोलिसांना विनंती करावी लागली. आम्हाला याच्यात मदत करा. पोलिसांना ही विनंती का करावी लागली?. हे गु्न्हेगार वर्षानुवर्ष मोकाट कोथरुड, पुणे जिल्ह्यात आजाबाजूला होते, त्यामुळे पुणे पोलिसांवर ही नामुष्की ओढवली” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

“याला जबाबार कोण? जनता म्हणून विचारत असू चंद्रकांतदादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार तुमचा सपोर्ट घेऊन पुणे शहरात गुन्हेगारी वाढवत असतील, तर तुम्ही खुलासा करा. माझा साधा प्रश्न होता. प्रश्न कोणाला विचारणार, तर त्या भागात मंत्री म्हणून काम करतात त्यांना प्रश्न विचारणार ना” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

समीर पाटीलला मी पाहिला नव्हता

“मी शिवसेनेच्या महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे म्हणून प्रश्न विचारला. समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्यासमोर आली. समीर पाटील नावाची व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमूळन पुण्याची गुन्हेगारी वाढवण्याचा प्रयत्न करतेय असं मी म्हटलं. समीर पाटीलला मी पाहिला नव्हता, त्याने प्रेस घेतली. धनगेकरवर अब्रु नुकसानीचा दावा करणार. 100 कोटीचा मी मालक आहे. मी हे करतो, मी ते करतो हा माणूस पुणेकरांना चॅलेंज करत होता” असं रवींद्र धंगेकर म्हणाले. “निलेश घायवळ आणी मी वाऱ्याला पण आसपास राहणार नाही. पण पुण्यातील जर गुन्हेगारी वाढत असेल, तर त्यावर बोलणं माझं कर्तव्य आहे” असं धंगेकर म्हणाले.

समीर पाटील बद्दल काय गौप्यस्फोट?

“दादांना प्रश्न विचारल्यावर या समीर पाटीलला एवढा राग आला. समीर पाटील कोण, म्हणून मी शोधायला गेलो. समीर पाटीलला एवढा राग आला तो म्हणाला माझ्यावर एकही केस नाही. मी सांगलीला गेलो, त्याच्यावर मोकामध्ये कारवाई झालेली आहे ते पेपर आहेत. चीटिंगचे पेपर आहेत. समीर पाटलावर सांगलीमध्ये असलेले हे गुन्हे. अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलेले. यात समीर पाटील नावाची व्यक्ती ढवळाढवळ करतो असं त्यांनी सांगितलं” रवींद्र धंगेकर यांनी हा गौप्यस्फोट केला.