Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपल्याला महासत्ता व्हायचं नाही, कारण….’, सरसंघचालक पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

"सायन्सचा फायदा ज्यांचा हाती साधनसंपत्ती होती त्यांनी घेतला. आज अशी स्तिथी आहे, एक बाजू उजळ आहे, मानव म्हणून गौरवशाली आहे. पण दुसरी बाजू पृथ्वीचा विनाश करणारी आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत", असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केलं.

'आपल्याला महासत्ता व्हायचं नाही, कारण....', सरसंघचालक पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?
मोहन भागवत
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 8:12 PM

पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या सहजीवन व्याख्यानमाला कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली. तसेच त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भारत विश्वगुरु व्हायला हवं, असं मत मांडलं. यावेळी त्यांनी जगातील विविध घटनांचं उदाहरण दिलं. “भारत विश्वगुरु झाला पाहिजे, असं आपल्या सगळ्यांना वाटतं. कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे जग फार सुखी आहे. जगाचा संबंध एकमेकांशी वाढलाय. विचाराने जग पुढे जातेय. जो कोणी आतापर्यंतचा जागाचा गुरु आहे त्याच्या मार्गदर्शनात सगळं ठीक चाललं आहे. सुख-सुविधा वाढल्या आहेत. पण मनुष्याजवळ सुख आहे का?”, असा सवाल मोहन भागवत यांनी केला.

“सोयीसुविधा वाढली, पण शांती नाही. कोणीही गोळीबार करतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढले. युद्ध थांबत नाहीत. कुठे ना कुठे युद्ध सुरु आहे. कट्टरपणा कमी होत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. जमीन प्रदूषित झालीय. पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही. येतो तेव्हा सगळं घेऊन जातो. हे आजच्या परिस्थितीचे वर्णन आहे”, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

“जगात सगळे सुखी होऊ शकत नाही. जगात 4 टक्के लोक जगातील 80 टक्के संसाधन वापरतात. जगात हा नियम आहे. सगळ्यांचं चांगले होणार नाही. बलवान असतील त्यांच फक्त चांगलं होणार. जगात अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे. मानव जात एकच आहे, असं म्हणायची चाल आहे”, असंही त्यांनी म्हटलं.

हे सुद्धा वाचा

‘या जगात एक राक्षशी प्रवृत्ती…’

“खायला बकरीचे मास पाहिजे, तर बकरी पाळली पाहिजे. सायन्सच्या आधारवर सर्व सुरु आहे. ते देखील बदलत असतं. सायन्सचा फायदा ज्यांचा हाती साधनसंपत्ती होती त्यांनी घेतला. आज अशी स्तिथी आहे, एक बाजू उजळ आहे, मानव म्हणून गौरवशाली आहे. पण दुसरी बाजू पृथ्वीचा विनाश करणारी आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. या जगात एक राक्षशी प्रवृत्ती आहे तिला वाटत आम्ही म्हणू तस झालं पाहिजे. दुसरी प्रवृत्ती दैवी प्रवृत्ती आहे ती म्हणते आम्हाला जगू द्या, तुम्हीही जगा. जगाला गुरुची आवश्यकता आहे आणि तो भारत होऊ शकतो”, असं स्पष्ट मत सरसंघचालकांनी व्यक्त केलं.

“आपल्याला महासत्ता व्हायचं नाही. कारण महासत्ता झाल्यावर काय करतात लोक ते आपल्याला माहीत आहे. श्रीलंका भरतासोबत कशी वागली ते आपल्याला माहीत आहे. पण श्रीलंकेला पहिली मदत नेहमी भारताने केली. विश्वगुरु भारत झाला पाहिजे तर आपण काय करावं? या देशाची भक्ती आम्ही का करावी? असा प्रश्न तरुणांना पडत असेल”, असं मोहन भागवत म्हणाले.

‘आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र’

“भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल. आमचं राष्ट्र परोपकारासाठी तयार झालंय. इतरांच्या देवी दैवतांचे हाटाळणी करू नये. आम्ही सगळ्यांबरोबर मिळून मिसळून जगभरात राहतोय. राम मंदिर झालं पाहिजे असं हिंदूना वाटत होतं. पण असं झालं म्हणजे नेता होता येतं, असं नाही. आपला देश आता संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झालं. ज्याची त्याची पूजा ज्याला त्याला लक लाभो. पण नियम पाळले गेले पाहिजे. आपलं राष्ट्र इंग्रजांनी तयार केलेले नाही. आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र आहे”, असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.