“कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही”

संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी आज गुंड गजा मारणेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक केली होती. शिवाजीनगर न्यायालयाने 25 हजारांच्या जात मचुलक्यावर त्यांना जामीन दिला. Sanjay Kakade Gaja Marane

कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही
संजय काकडे, माजी खासदार
Yuvraj Jadhav

|

Apr 21, 2021 | 7:23 PM

पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. शिवाजीनगर सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दिली. (Sanjay Kakade first reaction after getting bail by Shivajinagar court he arrested today by Pune Police)

संजय काकडेंना अटक का?

गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या असल्याच्या माहितीवरुन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती होती. संजय काकडे यांना आज दुपारी कोर्टात हजर केलं गेलं. शिवाजीनगर सत्र न्यायालयानं संजय काकडे यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही

कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही अशी प्रतिक्रिया न्यायालयातून जामीन मिळाल्यावर भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दिलीय. पालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर आल्यानं हे राजकारण केलं जात असल्याचा आरोप काकडे यांनी केलाय.

नेमकं प्रकरण काय?

गुंड गजा मारणेची 15 फेब्रुवारीला तळोजा कारागृहातुन सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांकडून तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणूकीत गजा मारणेचे साथीदार शेकडो वाहनं घेऊन सहभागी झाले होते. त्यानंतर त्या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आले होते. अशी मिरवणूक काढून आणि त्याचे व्हिडीओ पसरवून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा गजाचा प्रयत्न होता, असा पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केला होता.

पोलिसांना संजय काकडेंची चौकशी का करायचे?

दहशत निर्माण करण्याचा हा कट रचण्याचा उद्देश काय होता? या कटात आणखी कोण कोण सहभागी होतं. या आणि इतर गोष्टींचा तपास करायचा आहे आणि संजय काकडे हे गजानन मारणेशी संबंधित असल्याने त्यांच्याकडे चौकशी करण्याची गरज आहे,असं म्हणत पोलिसांनी काकडेंच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पुणे शिवाजीनगर सत्र न्यायालयाने संजय काकडेंना पंचवीस हजार रुपयांच्या जातमचुलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी काकडे यांची भाजप मधून हकालपट्टी करावी अशी मागणी केलीय.

संजय काकडे कोण आहेत?

संजय काकडे हे भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार होते. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले होते. काकडे हे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आहेत. ‘संजय काकडे ग्रुप’ असे त्यांच्या बांधकाम कंपनीचे नाव आहे. आपल्या ‘राजकीय भविष्यवाणी’मुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. संजय काकडे यांचे सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत.

संबंधित बातम्या:  VIDEO | गुंड गजा मारणेला सातारा पोलिसांनी कसं पकडलं?, पाहा थरारक CCTV फुटेज

मोठी बातमी: गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

(Sanjay Kakade first reaction after getting bail by Shivajinagar court he arrested today by Pune Police)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें