
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सकाळपासून चर्चा सुरू आहे. करुणा मुंडे यांनी याविषयीचा दावा केला आहे. तर दुसरीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच ही क्रूर हत्या घडवल्याचे सीआयडी तपासात पुढे आले आहे. पण मुंडे यांना वाचवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यासाठी पडद्याआड काय घडामोडी घडल्या याची त्यांनी जंत्रीच वाचली.
काय केला गंभीर आरोप?
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात खोटा अजेंडा राबवल्याने धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी केलं नाही, यात मुंडेना शिक्षा झाली असती मात्र राजकिय मित्राला वाचवलं, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सोईस्कर पद्धतीने हे प्रकार संपविले राजकीय लोकांची राजकीय मैत्री जागी झाली आणि ही मैत्री जागी झाली की सर्वसामान्य जनतेला अन्याय सहन करावा लागतो.बडा नेता कोण हे न्यायालयाच्या पटलावर हा विषय आला की बड्या नेत्याला फोन केला मात्र सरकारने नेता वाचविला. या नेत्याचा हात शंभर टक्के आहे. सरकारने गुंड मित्र वाचविला. असा आरोप जरांगे यांनी केला. आता बीडमध्ये खून, खंडणी, जमीन बळकविण्याचे प्रकार घडल्यास यांच्या टोळीला सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.
मुंडे यांना क्लीनचिट
संतोष देशमुख प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्ती नंतर चार्जशिट दाखल झाली. चार्टशिट दोन महिने दाखल होत नाही, असे धनंजय देशमख यांनी अगोदरच सांगितले होते. पुरवणी आरोप पत्रात सहआरोपी होतीलच अशी शंका असल्याने या प्रकरणात धनंजय मुंडेना क्लीनचिट देण्यात आली. निकम यांनी नियुक्ती स्वीकारताच दुसर्या दिवशी चार्टशीट दाखल करण्यात आली, याकडे जरांगे पाटील यांनी माध्यमांचं लक्ष वेधले. ते पुण्यातील खेड येथे माध्यमांशी बोलत होते.
संतोष देशमुख प्रकरणाचे चार्जशीट अजून दोन महिने दाखल होणार नाही अशी अपेक्षा होती. त्या चार्जशीटमध्ये फोडाफोडी होणार नाही यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या दुसर्या दिवशीच चार्जशीट दाखल करण्यात आली. धनंजय मुंडे सहआरोपी होणार होते. मात्र मुंडे या प्रकरणात वाचले. त्यांना वाचवण्यात आले असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
गुंड नेत्याला वाचवले, पण सरपंचाला न्याय नाही
छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड आणि राजकीय मित्र वाचवला. मात्र तुमच्या पक्षाचा प्रमाणिक सरपंचाला न्याय देऊ शकला नाही, असा गंभीर आरोप जरांगे यांनी भाजपावर केला. सरकारच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणाने त्यांचे राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली. मात्र पुढील तपासात काही सहआरोपी होतात पाहू. मात्र न झाल्यास पुढील काळात त्रास देणार्या टोळीविरोधात आमची मोहिम असेल असे ते म्हणाले.