साताऱ्याच्या मलकापूरमध्ये 7 वर्षांपासून शालेय मुलींना मोफत प्रवास, मलकापूर पॅटर्न राज्यानं स्वीकारल्याचा आनंदोत्सव

| Updated on: Mar 09, 2021 | 5:20 PM

मलकापूर नगरपरिषद 2013 पासून शालेय मुलींना फ्री एसटी ही योजना स्वखर्चातून राबवत आहे. Malkapur Pattern free ST bus Travel

साताऱ्याच्या मलकापूरमध्ये 7 वर्षांपासून शालेय मुलींना मोफत प्रवास, मलकापूर पॅटर्न राज्यानं स्वीकारल्याचा आनंदोत्सव
मलकापूर पॅटर्न
Follow us on

सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला. अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींसाठी महत्वाची घोषणा करण्यात आली. अर्थमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थिंनीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना जाहीर केली. त्या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना त्यांच्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची योजना जाहीर केली. मात्र, सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेत ही योजना 7 वर्षांपासून सुरु आहे. (Satara Malkapur Pattern accepted by State Government for free ST bus Travel for girl student in Rural Area)

पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतील योजना

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून शालेय मुलींना फ्री एसटीची सोय ही योजना सुरु कऱण्यात आली. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषद नऊ वर्षांपासून यशस्वीपणे राबवत आहे. हा मलकापूर पॅटर्न राज्याने स्वीकारल्याचा आनंद मलकापूरवासीय व्यक्त करत आहेत. यावर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय मुलींसाठी फ्री एसटी बसची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी मलकापूरमध्ये ही योजना 2013 पासून सुरु आहे. मलकापूर नगरपरिषद स्वखर्चातून ही योजना राबवते.

प्रमिलाताई चव्हाण कन्या सुरक्षा योजना

मलकापूर नगरपरिषद 2013 पासून शालेय मुलींना फ्री एसटी ही योजना स्वखर्चातून राबवत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही योजना साकरण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रमिलाताई चव्हाण कन्या सुरक्षा योजना या नावाने योजनेचा शुभारंभ झाला होता. ही योजना आज अखेर सुरू मलकापूर शहरात सुरु आहे. शालेय मुलीनां फ्री बसचा मलकापूर पॅटर्न राज्याने स्वीकारल्याचा आनंद मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना

अजित पवार यांनी विधानसभेत बोलातना महाराष्ट्र हे महिला धोरणाच्याबाबतीत अग्रेसर राज्य असल्याचं म्हटलं. मुलींच्या शिक्षणासाठी राज्यानं अनेक प्रागतिक पावलं उचलली आहेत. मुलींचे बारावीपर्यंत शिक्षण मोफत केल्यानंतर राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन देत असल्याचे अजित पवारांनी सांगितले. या योजनेसाठी राज्य परिवहन महामंडळाला पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एसटी उलटली, चालक पसार, कंडक्टर ताब्यात

मुंबईत पश्चिम द्रुतगती मार्गावर एसटी बस उलटून अपघात

(Satara Malkapur Pattern accepted by State Government for free ST bus Travel for girl student in Rural Area)