वंदे भारत एक्स्प्रेस चालवणारी पहिली महिला आहे तरी कोण, मुंबई-पुणे मार्गावर चालवली एक्स्प्रेस

| Updated on: Mar 14, 2023 | 5:45 PM

साताऱ्यातील एका 57 वर्षीय महिलेने वंदे भारत एक्स्प्रेस चालवली आहे. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस चालवणारी त्या देशातील पहिल्या महिल्या झाल्या आहेत.

वंदे भारत एक्स्प्रेस चालवणारी पहिली महिला आहे तरी कोण, मुंबई-पुणे मार्गावर चालवली एक्स्प्रेस
वंदे भारत चालवणारी पहिली महिला
Image Credit source: social media
Follow us on

पुणे : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. आता पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस 10 फेब्रवारीपासून सुरु झाली आहे.  तिला प्रतिसादही चांगला मिळत आहे. मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या रेल्वेचे उद्घाटन केले होते. आता आणखी एक इतिहास या रेल्वेच्या नावावर लिहिला गेला आहे. एका 57 वर्षीय महिलेने वंदे भारत एक्स्प्रेस चालवली आहे. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस चालवणारी त्या देशातील पहिल्या महिल्या झाल्या आहेत.

कोण आहेत सुरेखा यादव

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस 120 ते 160 किमी वेगाने धावते. वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6.50 वाजता सुटते. पुण्यात सकाळी 9 वाजता पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता मुंबईला पोहचेल. त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता ती मुंबईहून निघते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला पोहचेल. रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहचणार आहे. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असेल.

आता ही गाडी 57 वर्षीय सुरेखा यादव (Surekha Yadav) ने चालवली आहे. त्यानंतर तिची देशभरात चर्चा सुरु झाली आहे. सुरेखा यादवने सोमवार मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचे संचालन केले. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस चलवणारी त्या पहिली महिला लोकोमोटिव पायलट झाल्या आहेत. सुरेखा यादव गेल्या 34 रेल्वेत कार्यरत आहे. 2 वर्षांपूर्वी महिला दिनी त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती १३ मार्च रोजी पूर्ण झाली. त्या साताऱ्यातील रहिवाशी आहेत. त्यांनी मालगाडीही चालवली आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केलेय.

मेक इन इंडिया ट्रेन

देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे. वंदेभारतच्या 75 रेकची निर्मिती पहिल्या टप्प्यात होणार असून त्यात जरी चेअरकारचे डबे असले तरी तिची आसने आता अधिक आरामदायी करण्यात आली आहेत.