सिरम इन्स्टिट्यूटकडून पुण्याला लस देण्याची तयारी, पण तांत्रिक अडचणींमुळे रखडपट्टी, महापौरांचा आरोप

| Updated on: May 22, 2021 | 9:35 AM

एकीकडे पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसीकरणाची मोहिम संथगतीने सुरु आहे. अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा भासू लागला आहे. (Pune Mayor Murlidhar Mohol allegation On Corona vaccine)

सिरम इन्स्टिट्यूटकडून पुण्याला लस देण्याची तयारी, पण तांत्रिक अडचणींमुळे रखडपट्टी, महापौरांचा आरोप
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
Follow us on

पुणे : एकीकडे पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसीकरणाची मोहिम संथगतीने सुरु आहे. अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला आहे. पुणे महापालिकेत कोरोना लसींचा पुरवठा न झाल्याने आजही सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. सिरम इन्स्टिट्युटकडून पुण्याला लस देण्याची तयारी आहे. पण तांत्रिक अडचणींमुळे रखडपट्टी होत आहे, असा आरोप पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. (Serum Institute ready to give Corona vaccine Pune but due to technical difficulties it gets delay Pune Mayor Murlidhar Mohol allegation)

पुण्यातील लसीकरण केंद्र बंद

लसींचा पुरवठा न झाल्याने शनिवारी 22 मे रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहे. पुणे मनपाला लस प्राप्त झाल्यानंतर पुढील नियोजन जाहीर केले जाईल. याची पुणेकर नागरिकांनी नोंद घ्यावी, असे ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

सिरम इन्स्टिट्युटची पुण्याला लस देण्याची तयारी

दरम्यान या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्युटची पुण्याला लस देण्याची तयारी आहे. पण त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती.

तसेच यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट देऊन येथील अधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे बोललं जात आहे. यावेळी पुण्याला लस देण्याचा आग्रही मागणी करण्यात आली.

लसींचा सर्वत्र तुटवडा 

राज्य सरकारकडून सर्वच महानगरपालिकेला प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसींचा पुरवठा करण्यात आलेला नाही. यामुळे लसीकरणाची मोहीम रखडली आहे.

दिव्यांग आणि दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांना प्राधान्य

लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात झाल्यानंतर सुरुवातीला दिव्यांग नागरिक, दुसऱ्या डोसचे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या पहिल्या डोस घेणाऱ्या नागरिकांना कोरोना लस दिली जाईल. यानंतर ऑनस्पॉट नोंदणीसाठी आलेल्या पहिल्या डोसच्या लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. (Serum Institute ready to give Corona vaccine Pune but due to technical difficulties it gets delay Pune Mayor Murlidhar Mohol allegation)

संबंधित बातम्या :

पुणे म्युकर मायकोसिसचा हॉटस्पॉट, आतापर्यंत 20 दगावले; रुग्णालयांसाठी नियमावली

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढता धोका, लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा : अजित पवार

म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, रुग्णांच्या आर्थिक मदतीत वाढ