म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, रुग्णांच्या आर्थिक मदतीत वाढ

शहरी गरीब योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारांसाठी केली जाणारी आर्थिक मदत आता 1 लाखावरुन 3 लाख रुपये करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे.

म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, रुग्णांच्या आर्थिक मदतीत वाढ
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 10:37 PM

पुणे : कोरोनासह आता राज्यात म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी या आजारानं थैमान घातलंय. पुणे हात तर म्युकरमायकोसिसचा हॉटस्पॉट ठरलाय. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय. त्यांनी रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी केलीय. आता पुणे महापालिकेनंही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी एक दिलासा देणारा निर्णय घेतलाय. शहरी गरीब योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारांसाठी केली जाणारी आर्थिक मदत आता 1 लाखावरुन 3 लाख रुपये करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. (Pune Municipal Corporation decides to increase financial assistance for mucormycosis patients)

पुणे महापालिकेनं आर्थिक मदत वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या दळवी रुग्णालयात फक्त म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी 15 बेड राखीव ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. शिवाय पुणे महापालिका नेत्रतज्ज्ञ आणि घसातज्ज्ञांचीही भरती करणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन

याबाबत अधिक माहिती देताना महापौर मोहोळ पुढे म्हणाले की, ‘पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रूग्णालयात १५ बेड हे म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच म्युकरमायकोसिस आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील रूग्णालयात तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

‘पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करताना या ठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर अद्ययावत करुन सज्जताही ठेवण्यात येत आहे. शिवाय उपचार करताना या आजारासंबंधी तज्ञ डॉक्टरांची नेमणूकही तातडीने केली जात आहे. कोरोनावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी म्युकरमायकोसिस बाबतीत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. लवकर निदान झाले तर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे’, असेही महापौर म्हणाले.

पुणे म्युकरमायकोसिसचा हॉटस्पॉट

राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे म्युकर मायकोसिसच्या रुग्णसंख्येत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात आतापर्यंत 318 जणांना म्युकर मायकोसिसची लागण झाली असून 20 जणांचा बळी गेला आहे. त्याशिवाय आतापर्यंत 1257 जणांना म्युकर मायकोसिसची बाधा झाली आहे. राज्यातही म्युकर मायकोसिसचा प्रकोप वाढू नये म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्याचं राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं.

ससूनमध्ये स्वतंत्र वार्ड

दरम्यान, म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतर ससून रुग्णालयात वार्ड तयार करण्यात आला आहे. 50 ऑक्सिजन बेड आणि 10 आयसीयू बेड आणि स्वतंत्र ऑपरेशन थिएटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोरोना आणि म्युकर मायकोसिसच्या रुग्णासाठी 10 ऑक्सिजन बेड आणि 5 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 12 दगावले

पिंपरी-चिंचवड शहरातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे 12 रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज 3 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या ‘या’ गोष्टी कराच…

Pune Municipal Corporation decides to increase financial assistance for mucormycosis patients

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.