कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

म्युकोरमायकोसिस या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे रुग्णांमधील धोका वाढत आहे. (Mucormycosis after recovered from Covid-19) 

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?
Mucormycosis
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 9:33 AM

पिंपरी चिंचवड : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका असताना आता कोरोनामुक्त झालेल्यांना गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. मधुमेहाचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना विशेषतः म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे. म्युकोरमायकोसिस हा एक धोकादायक फंगल इंफेक्शन आहे. (Mucormycosis fungal infection after recovered from Covid-19)

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ची लक्षणे दिसत आहे. यातील अनेक जण हे कोरोना आजारातून बरे झालेले आहे. पण कोरोनापश्चात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामुळे रुग्णाच्या वरच्या जबड्यात आणि वरच्या जबड्याच्यावर असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये काळसर अशी बुरशी तयार होते. ही म्युकोरमायकोसिस या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे रुग्णांमधील धोका वाढत आहे.

?म्युकोरमायकोसिस म्हणजे काय??

म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत

म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे.

म्युकोरमायकोसिस कसा पसरतो?

म्युकोरमायकोसिस हा असा आजार आहे, ज्याद्वारे श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात. बहुधा फुफ्फुसातील आणि त्वचेमध्ये या फंगल इंफेक्शनची सुरुवात होते.

?याची लक्षणे कोणती??

  • तीव्र डोकेदुःखी
  • अंगात सतत बारीक ताप
  • गालावर सूज किंवा बधिरपणा येणे
  • नाक गळणे
  • जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे
  • वरच्या जबड्यातील दातांचे हलणे
  • जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे
  • वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे

?आजार टाळण्याचे उपाय?

?तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे किंवा वॉश देणे.

?मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टिरॉइड आणि इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करणे.

?रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणे.

?लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपचार करणे.

(Mucormycosis fungal infection after recovered from Covid-19)

संबंधित बातम्या : 

कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?; तज्ज्ञांनी सांगितली ‘ही’ डेडलाईन

महिंद्राने सुरु केली ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ योजना, जाणून घ्या या मोफत सेवेचा कोणाला होईल फायदा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.