Video : फुकटच्या चपला, बुटांसाठी टोळक्याचा धुडगूस, दुकानदार अन् ग्राहकांची पळापळ

| Updated on: Mar 25, 2022 | 2:30 PM

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एक अजबच घटना घडली आहे. फुकट बूट चपला लाटण्यासाठी दहशत उडवत एका दुकानात एका टोळक्याने धुडगूस घातला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. पोलिसांकडून या टोळक्याचा शोध सुरू आहे.

Video : फुकटच्या चपला, बुटांसाठी टोळक्याचा धुडगूस, दुकानदार अन् ग्राहकांची पळापळ
बूट, चपला चोरण्यासाठी टोळक्यानं दुकानात घातला धुडगूस
Image Credit source: Tv9
Follow us on

पिंपरी चिंचवड : एका टोळक्याने जबरी चोरी केली, अशा बातम्या आपण वाचतो. दागिन्यांवर किंवा मौल्यवान वस्तू डल्ला मारल्याचे आपण ऐकले असेल. पण पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एक अजबच घटना घडली आहे. एका टोळक्याने धुडगूस घातला पण तो फुकटच्या चपला, बुटांसाठी… होय… फुकट बूट चपला लाटण्यासाठी दहशत उडवत एका दुकानात एका टोळक्याने धुडगूस घातला. हातात कोयते, तलवार, दारूची बाटली, सिमेंटचे गट्टू घेऊन त्यांनी फुटवेअरच्या दुकानात (Footwear shop) प्रवेश केला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंपरी मार्केटमधील एम. बी. फुटवेअर या दुकानात आठ जणांच्या टोळक्याने रात्री सव्वा आठच्या सुमारास प्रवेश केला. हातात घातक शस्त्र असल्याने दुकानातील ग्राहक आणि मालकांची यावेळी भंबेरी उडाली.

टोळक्याचा शोध सुरू

एकाच वेळी एवढे लोक दुकानात शिरल्याने दुकानाच्या आत असलेल्या व्यक्तींमध्ये घबराट पसरली होती. फायदा घेत या टोळक्याने 17-18 बूट, चप्पल जोड्या घेतल्या आणि तेथून पसार झालेत. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पिंपरी पोलिसांकडून या टोळक्याचा शोध सुरू आहे.

दुकानाच्या बाहेर धाव

दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत आपल्याला तोंड झाकलेली काही मुले दिसत आहेत. त्यांच्या हातात तोडफोड करणारे साहित्य दिसत आहे. अचानक दुकानात प्रवेश करून त्यांनी धुडगूस घातला. त्यामुळे दुकानदार तर भयभीत झालेच. मात्र ग्राहकांनाही काय सुरू आहे, हे कळाले नाही. त्यांनी दुकानाच्या बाहेर धाव घेतली.

आणखी वाचा :

Pune crime : पुन्हा संतापजनक घटना! हिंजवडीत बापानंच केला स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार

Pune Crime | शाळेतील स्वच्छतागृहात11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यात कुठं घडला हा प्रकार; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Pune Metro Tax |आता 1 एप्रिलपासून पुणेकरांना बसणार मेट्रो कराचा भुर्दंड ; घराच्या किंमती वाढणार