स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात विशेष अभियान, सलग 75 तास होणार कोरोना लसीकरण

| Updated on: Oct 04, 2021 | 7:51 PM

पुणे शहरात विक्रमी लसीकरण झाले असले तरी देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे मनपा हद्दीत सलग  75 तास लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या दोन केंद्रांवर सलग  75 पुरतील असे उपलब्ध करण्यात आले आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात विशेष अभियान, सलग 75 तास होणार कोरोना लसीकरण
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

पुणे : पुणे शहरात विक्रमी लसीकरण झाले असले तरी देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे मनपा हद्दीत सलग  75 तास लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या दोन केंद्रांवर सलग  75 पुरतील असे उपलब्ध करण्यात आले आहेत. या लसीकरणाचा पुणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

लसीकरण मोहिमेला व्यापकता देण्याचा प्रयत्न

देशभरात यंदा ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. यात विविध उपक्रम राबवले जात असताना लसीकरण मोहिमेला व्यापकता देण्याचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे मनपा हद्दीत सलग 75 तास लसीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे.

सलग 75 तास लसीकरणाचा उपक्रम

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे मनपा हद्दीत अलीकडच्या काही आठवड्यात लसीकरणाने उत्तम वेग पडकला असून यात सातत्य आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती नियंत्रित आहे. दुसरीकडे आपण महापालिकेचे मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटल आणि कोथरुड येथील सुतार हॉस्पिटल या ठिकाणी सलग 75 तास लसीकरणाचा उपक्रम राबवत आहोत. आजपासून (मंगळवारी) या दोन्ही केंद्रांवर सलग 75 तास लसीकरण होणार आहे. लसीकरण न झालेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा’.

पुण्यात सिरिंजचा तुटवडा

दरम्यान, पालिकेने सलग 75 तास कोरोना लसीकरण राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना लसीकरण मोहीम वेगाने पुढे नेण्यात अडथळे येताना दिसत आहेत. कोरोनाची लस देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सच्या सुयांच्या (सिरींज) तुटवड्यामुळे सध्या पुणे महानगरपालिकेसमोर समस्या उभी राहिली आहे. सध्याच्या घडीला पुणे महानगरपालिकेकडे इंजेक्शनच्या केवळ 30 हजार सिरींज उपलब्ध आहेत. त्यामुळे आता आठवड्यातून केवळ तीन दिवसच लसीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेने तीन दिवसांपूर्वीच एक लाख सिरींज खरेदी केल्या होत्या. मात्र, हा साठाही संपत आल्याने पुण्यातील लसीकरण मोहीमेला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्या :

केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा, नाना पटोलेंचा घणाघात

भावना गवळींची ईडी चौकशीला दांडी, हजर राहण्यासाठी मागितला 15 दिवसांचा वेळ!

बाप म्हणून शाहरुख खानला वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नाही? आज कोर्टात नेमकं काय झालं? पुढे काय होणार?

(Special campaign in Pune on occasion of indian Independence 75th anniversary Corona vaccination will be held for 75 hours)