मोठी बातमी: दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या तर आंदोलन करु; पुण्यातील विद्यार्थ्यांचा इशारा

| Updated on: Apr 12, 2021 | 4:01 PM

आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. | SSC, HSC board exam 2021

मोठी बातमी: दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या तर आंदोलन करु; पुण्यातील विद्यार्थ्यांचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

पुणे: राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा (HSC board exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन काही तास उलटत नाही तोच पुण्यातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याला विरोध दर्शविला आहे. एकतर या परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा रद्द तरी करून टाका, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता शिक्षण खाते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (SSC and HSC boards exam in Maharashtra postphoned by Thackeray govt)

तत्पूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. मुळे गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारने परीक्षा पुढे का ढकलली?

हा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी आत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला.
सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वीकारावा, अशी विनंती मी करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांची एन्ट्री; रस्त्यावर आडवं पडून जोरदार घोषणाबाजी

आता परीक्षा झाल्या तर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होईल; दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकला: नाना पटोले

दहावी-बारावीच्या मुलांना सरसकट पास करा; परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधान मोदींना विनंती

(SSC and HSC boards exam in Maharashtra postphoned by Thackeray govt)