बारामतीत गेम पालटला, युगेंद्र पवार यांच्या पॅनलचा सुपडा साफ, सुनेत्रा पवारांचा पॅनेलचा दणदणीत विजय

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या निकालाने बारामतीतील राजकीय गेम पूर्णपणे पलटला असून शरद पवारांच्या पॅनलला मोठा धक्का बसला आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाने बारामतीवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

बारामतीत गेम पालटला, युगेंद्र पवार यांच्या पॅनलचा सुपडा साफ, सुनेत्रा पवारांचा पॅनेलचा दणदणीत विजय
sunetra pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 12, 2026 | 7:24 PM

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गेम पालटला आहे. केवळ पुरुषोत्तम जगतापच नाही तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन असलेल्या युगेंद्र पवार यांच्या पॅनललाही सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने 21 पैकी 21 जागा जिंकल्या आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यासह सर्वच विरोधकांचा सुपडा साफ करून बारामतीवर आपलंच निर्विवाद वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार निवडून आले आहेत. संग्राम सोरटे, प्रमोद काकडे. अभिजीत काकडे आणि वसंतराव दगडे हे चार उमेदवार दुपारीच निवडून आले होते. त्यामुळे 21 पैकी थेट 4 जागांवर विजय मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार जल्लोष सुरू होता. बारामतीत गुलालाची उधळण करून कार्यकर्ते जल्लोष साजरा करत होते. मात्र संध्याकाळी निकालाचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने 21 पैकी 21 जागांवर निर्विवाद विजय मिळवला.

Loading...

विजयाचे श्रेय तिघाांना

या विजयानंतर अभिजीत काकडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी अभिजीत काकडे यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर सडकून टीका केली. तसेच विजयाचे श्रेय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना दिले आहे.

कार्यकर्त्यांचा जल्लोष

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. यावेळी बारामती तालुक्यातील सर्व मतदारांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सुनेत्रा पवार यांनी इलेक्शनमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यामुळे आम्हाला विजय मिळाला, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. गट नंबर 2 मधून राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप पिछाडीवर आहेत. पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपचे नेते संजय जगताप यांच्या सहाय्याने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभं केलं होतं. या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप जवळपास दीड हजार मतांनी पिछाडीवर होते. नंतर त्यांचाही पराभव झाला.  या निवडणुकीत सुनेत्रा पवार पहिल्यांदाच उतरल्या होत्या. मात्र, त्यांनी या निवडणुकीत चमत्कार घडवून पुरुषोत्तम जगताप आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us