नरकात जळो… पुनर्जन्मच होऊ नये… तनुश्री दत्ताचा नाना पाटेकरांना शाप; थेट महादेवालाच साकडं
नाना पाटेकर यांच्या निधनानंतरही तनुश्री दत्ताचा संताप कायम आहे. तिने महादेवाला प्रार्थना केली की नानांच्या आत्म्याला नरकात भयंकर यातना मिळो आणि त्यांना पुनर्जन्म मिळू नये. १८ वर्षांपासूनचे दुःख व्यक्त करत, तिने नानांच्या समर्थकांनाही लक्ष्य केले. 'हॉर्न ओके प्लीज' वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाला आता एक नवीन आणि तीव्र वळण मिळाले आहे.

दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चाहत्यांवर आकाश कोसळलं आहे. नाना पाटेकर यांच्या अचानक जाण्याने देशातील प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तनुश्री दत्ताने नानांची सातत्याने अवहेलना करणं सुरूच ठेवलं आहे. तनुश्री दत्ताने आधी ईव्हील डेड म्हणून नानांची अवहेलना केली. त्यानंतर नानांचा अचानक मृत्यू ही त्यांना शिक्षा आहे. त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालंय, असं तिने म्हटलं. आता पुन्हा एकदा तिने नाना पाटेकर यांच्यावर प्रचंड संताप, द्वेष व्यक्त केला आहे.
तनुश्री दत्ता महाकालच्या दरबारात जाऊन आली. नाना पाटेकर नरकात जळत राहो, अशी महादेवाकडे तिने प्रार्थना केलीय. इन्स्टावर तिने पोस्ट केली आहे. त्यात तिने नानांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. तुम्ही गेल्या 18 वर्षापासून माझं आयुष्य नरक बनवलंय. तुमची आत्माही नरकात भयंकर यातना आणि टॉर्चरमधून जाओ, ही मी प्रार्थना करते. तुमच्या सारखा सैतानी माणूस तिथून सुखरूप बाहेर पडू नये, असा शापच तनुश्री दत्ताने दिला आहे.
जोपर्यंत मी या ब्रह्मांडात आहे, तोपर्यंत तुम्हाला पुनर्जन्म मिळू नये आणि नरकातील भयंकर शिक्षेतून मुक्तीही मिळू नये. जगाला तुमच्या जाण्याचं दु:ख करू द्या. मी तुमच्या आत्म्याला 10,000 हून अधिक वर्ष जळताना पाहणार आहे. हीच तुम्हाला खरी शिक्षा आहे. माझ्यासाठी हाच न्याय आहे. जगात नावलौकीक मिळवला असेल पण देवाच्या दरबारात तुम्हाला स्थान नाहीये. तिथे माझा अधिकार चालतो. म्हणून तर माझ्या बोलण्याला महत्त्व आहे. हर हर महादेव, असा द्वेष तिने व्यक्त केला आहे.
तनुश्रीचे सवाल
या पोस्टमधून तिने नानांच्या समर्थकांवरही सवाल केले आहेत. ज्या व्यक्तीने एका जिवंत व्यक्तीला अब्यूज आणि टॉर्चर केलं. ट्रॉमा दिला. त्याचं कौतुक संपूर्ण समाज करत आहे. अशा घाणेरड्या लोकांनी पाण्यात बुडून मेलं पाहिजे. किंवा स्वत:ला आग लावून घेतली पाहिजे. मला नानांच्या सर्व समर्थकांची राखरांगोळी झालेली पाहायची आहे. माझ्या मनातून हे लोक उतरले आहेत. त्यांच्याबद्दलचा सन्मान निघून गेला आहे. मी या सर्व आत्म्यांना नानांकडे पाठवणार आहे, असंही तिने म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ताचा वाद जुनाच आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर दोघांमध्ये वाद झाला होता. तनुश्रीच्या मते, नानाने गाण्याच्या शुटिंगवेळी तिचा छळ केला होता. चुकीच्या पद्धतीने त्यांनी स्पर्श केल्याचा आरोप तिने केला होता. पण नानांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणी पोलीस केसही झाली होती. पण पुराव्याच्या अभावी नाना पाटेकर यांना क्लिनचिट मिळाली होती. त्यानंतर हे प्रकरण क्लोज झालं होतं.
