AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातवामुळे आजोबा अडचणीत, सुरेंद्र अग्रवाल यांची कुंडलीच पोलिसांनी बाहेर काढली

पुणे हिट अँड रन प्रकरणात आता पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. पुणे पोलिसांकडून प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर पोलीस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी आज सुरेंद्र अग्रवाल यांना कोर्टात हजर केलं. सुरेंद्र यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नातवामुळे आजोबा अडचणीत, सुरेंद्र अग्रवाल यांची कुंडलीच पोलिसांनी बाहेर काढली
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 25, 2024 | 4:20 PM
Share

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता सुरेंद्र अग्रवाल यांच्या अडचणी वाढणार आहेत. पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, सुरेंद्र अग्रवाल यांनी २ दिवस त्यांच्या ड्राईव्हरला कोंडून ठेवले होते. त्याने गुन्ह्या आपल्या अंगावर घ्यावा म्हणून त्याला जबरदस्ती करण्यात आली होती. अपघात प्रकरणात एकाच घरातील तीन पिढ्या अडचणीत आल्या आहेत. गाडीने २ जणांना उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. तर वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे तुरुंगात आहेत. सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विशाल अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

सुरेंद्र अग्रवाल तपासात सहकार्य करतील. त्यांना मेंदुचा आजार आहे त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांना बोलवावं लागतं म्हणून त्यांना जामीन मिळावा असा त्यांच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान युक्तीवाद केला आहे. गुन्हे शाखेकडून देखील सुरेंद्र अग्रवाल यांच्या घराची झडती घेण्यात आली.

कोण आहेत सुरेंद्र अग्रवाल

सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर याआधी देखील वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.ते बांधकाम व्यावसायिक आहेत. गोळीबार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अजय भोसले यांच्यावरील गोळीबार प्रकरणात ते सहआरोपी आहेत. सुरेंद्र अग्रवाल यांचे छोटा राजनसोबत संबंध असल्याचं समोर आलं होतं.

याआधी विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली होती. विशाल अग्रवाल आता न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्हे शाखेने या प्रकरणात घरातील इतर कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली आहे.

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी ड्रायव्हरच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पार्वती पुजारी यांची चौकशी होणार आहे. ड्राईव्हर गंगारामला कोणी आणि कसं डांबून ठेवलं याबद्दल अनेक पुरावे त्यांच्या पत्नीकडे असण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांनी ड्राईव्हरला देखील सुरक्षा पुरवली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी