AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय शिरसाट यांच्या ‘त्या’ विधानावर सुषमा अंधारे भडकल्या; म्हणाल्या, लेकीबाळीकडे बघण्याची गलिच्छ…

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर बोलताना तोल ढासळला. शिरसाट यांनी खालच्या पातळीवर जाऊन अंधारे यांच्यावर टीका केली होती. त्याला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय शिरसाट यांच्या 'त्या' विधानावर सुषमा अंधारे भडकल्या; म्हणाल्या, लेकीबाळीकडे बघण्याची गलिच्छ...
sushma andhareImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 27, 2023 | 9:41 AM
Share

पुणे : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. त्याला सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे. संजय शिरसाट यांनी माझ्याबद्दल सुमार विधान केलं. त्यांचा लेकीबाळींकडे बघण्याचा दृष्टीकोण सर्वांसमोर आला, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांचा समाचार घेतला आहे.

संजय शिरसाटांनी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. इतरांच्या लेकीबाळीकडे आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील पारमिता असावी लागते. सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट यांच्या सारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. अन् ज्याच्या ठायी शील पारमिता नाही, ती व्यक्ती बाबासाहेबांचा अनुयायी तरी असू शकते का? असा प्रश्न उरतोच. उलटपक्षी शिरसाट यांच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकीबाळींकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिला आहे. म्हणूनच मला शिरसाट यांच्या बोलण्याचा राग आला नाही. उलट स्वतःची वैचारिक लायकी दाखवून दिल्या बद्दल त्यांचे अभिनंदन, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते शिरसाट?

आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावेळी त्यांची जीभ घसरली होती. ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. काय काय लफडे केले तिने काय माहीत, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. अंबादास दानवे यांनी मला फोन केला होता. म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असा गौप्यस्फोटही शिरसाट यांनी केला. कोणीही आजकाल सोशल मीडियावर कॉमेट करतं. आम्हाला गद्दार… गद्दार म्हणतंय… अरे घरात बघ काय चाललंय. मग आमच्यावर टीका कर, असा टोला त्यांनी लगावला.

पश्चात्ताप व्यक्त करा

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवरही टीका केली. उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे महाविकास आघाडीचा मेळावा वाटत होता. मालेगावची सभा उद्धव ठाकरे यांच्या नावावर असली तरी ती सभा हिंदुत्वाची वाटत नव्हती. उद्धव ठाकरे यांनी सभेमध्ये केलेले वक्तव्य तपासून पाहिले पाहिजे. आम्ही कुणाचेही काही चोरले नाही. आम्ही नेहमी आमची नाराजी व्यक्त केली. माणसे आणि विचार चोरल्या जाऊ शकत नाही.

आज उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जे लोक आहेत ते त्यांचे कधीच नव्हते. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या लोकांनी 40-45 वर्षे शिवसेनेत काम केलंय. उद्धव ठाकरे यांच्याकडून काही चूक झाली असेल म्हणून बाळासाहेबांचे खंदे समर्थक सोडून गेले. याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे. आणि पश्चाताप व्यक्त केला पाहिजे, असं शिरसाट म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?