Pune Auto Price Hike : पुण्यातल्या रिक्षांचं भाडं वाढलं, पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामतीत आता किती भाडं मोजावं लागणार? वाचा एका क्लिकवर

| Updated on: Jul 25, 2022 | 6:04 PM

इंधनाचे वाढते तर आणि रिक्षाचालकांची होणारी आर्थिक परवड पाहता परिवहन प्राधिकरणाने हा निर्णय घेतलेला आहे.

Pune Auto Price Hike : पुण्यातल्या रिक्षांचं भाडं वाढलं, पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामतीत आता किती भाडं मोजावं लागणार? वाचा एका क्लिकवर
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : येत्या 1 ऑगस्टपासून पुणेकरांच्या (Pune Auto Price Hike) खिशाला कात्री लागणार आहे. कारण पुण्यातल्या रिक्षांचा भाडं वाढवण्यात आलेलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती मध्ये फिरण्याकरता तुम्हाला आता रिक्षासाठी (Auto Rikshaw) अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. यामध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (Pune Transport) नवे आदेश काढले आहेत. पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना 2 रुपये अतिरिक्त आकारता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 1 रुपया आकारता येणार आहे. आता रिक्षा चालकांना पहिल्या एक किलोमीटरसाठी 23 रुपये भाडे आकारता येणार आहेत. तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 15 रुपये अकारणे बंधनकारक राहणार आहे. येत्या 1 तारखेपासून नवे दर लागू होणार आहेत. इंधनाचे वाढते तर आणि रिक्षाचालकांची होणारी आर्थिक परवड पाहता परिवहन प्राधिकरणाने हा निर्णय घेतलेला आहे.

इंधनाचे दर वाढल्याने मोठा निर्णय

गेल्या काही दिवसात वाढलेले इंधनांचे दर पाहिल्यास सर्वसामान्य माणसाला धडकी भरवणारे हे दर आहेत. त्यात गॅसच्या दरात ही मोठी वाढ झाली आहे. सीएनजीच्या वाढलेले दर आणि रिक्षाचं कमी असणारं भाडं यातला ताळमेळ एकत्र रिक्षाचालकांना लागत नव्हता. सीएनजी साठी जाणारे पैसे काढले तर रिक्षा चालकाच्या हातात काहीही नफा उरात नव्हता. त्यामुळे भाड्यामध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी वारंवार रिक्षा चालक संघटनांकडून करण्यात येत होती. तीच मागणी मान्य करत प्राधिकरणाने आज हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या एक ऑगस्टपासून पुणेकरांचा रिक्षा प्रवास माहागला आहे.

इंधन दरात दिलासा मिळण्याची अपेक्षा

गेल्या काही दिवसात इंधनांच्या दरांमध्ये ज्याप्रकारे वाढ झाली आहे, त्यामुळे फक्त रिक्षा चालकांचं नाही तर सर्वसामान्य माणसाच महिन्याचा बजेट ही कोलमंडलं आहे. त्यामुळे गॅसच्या किमतीत कमी करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य माणसांकडून वारंवार होतेय, त्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये टोकाचा संघर्ष ही पाहायला मिळाला. मात्र आता सरकार बदलल्यानंतर तरी इंधनाच्या दरांमध्ये आणखी काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आता सध्या पुण्यात रिक्षाची फेरी मारण्यासाठी 21 रुपये मोजावे लागत होते. त्याच दरात वाढ होऊन आता ते दर हे 23 रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच एक किलोमीटरपेक्षा आणखी काही किलोमीटर पुढे गेल्यास हा दर आणखी वाढणार आहे.