प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार पुणे स्टेशनमधील 6 प्लॅटफॉर्मवर 24 डब्यांच्या गाड्या राहणार उभ्या

| Updated on: Jun 07, 2022 | 11:10 AM

पुणे रेल्वेस्थानकावरून रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. या स्थानकावरून प्रवासी ये- जा करतात. या स्थानकावर प्रवासी व गाड्यांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी व्हावी, यासाठी हडपसर येथे नवे टर्मिनल बनविण्यात आले आहे.

प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार पुणे स्टेशनमधील 6 प्लॅटफॉर्मवर 24 डब्यांच्या गाड्या राहणार उभ्या
Follow us on

रेल्वे प्रशासनाकडून पुणे रेल्वेस्थानकावर असलेल्या काही प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल. मालाची वाहतूक करता येणार असून, सोबतच रेल्वेच्या महसुलातदेखील वाढ होणार आहे.

पुणे रेल्वेस्थानकावरून रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. या स्थानकावरून प्रवासी ये- जा करतात. या स्थानकावर प्रवासी व गाड्यांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी व्हावी, यासाठी हडपसर येथे नवे टर्मिनल बनविण्यात आले आहे. स्थानकावर जादा डब्यांची गाडी उभी राहावी, यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील काही कोचवर 24 डब्यांची गाडी उभी राहू शकते. मात्र, काही कोचवर 18,19 डब्यांची गाडी उभी राहते. त्यामुळेच रेल्वेकडून येथील सर्वच्या सर्व 6 प्लॅटफॉर्मवर 24 डब्यांची गाडी उभी राहील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रवाशांची क्षमता

3 एसी डबा – 64 प्रवासी

2 एसी डबा – 46 प्रवासी

स्लीपर डबा – 72 प्रवासी

स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक आणि गाडीचे डबे

प्लॅटफॉर्म नं 1 – 24 डब्यांची गाडी उभी राहते

प्लॅटफॉर्म नं 2 – 24 डब्यांची गाडी उभी राहते

प्लॅटफॉर्म नं 3 – 24 डब्यांची गाडी उभी राहते

प्लॅटफॉर्म नं 4 – 18 डब्यांची गाडी उभी राहते

प्लॅटफॉर्म नं 5 – 18 डब्यांची गाडी उभी राहते

प्लॅटफॉर्म नं 6 – 22 डब्यांची गाडी उभी राहते