Pune crime : चारित्र्याचा संशय घेऊन प्रेयसीच्या डोक्यात घातला दगड; निर्दयी प्रियकराला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

| Updated on: Jul 11, 2022 | 5:43 PM

आरोपी चौगुले हा तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. तर त्याची प्रेयसी केअरटेकर म्हणून काम करत होती. दोघेही एकाच गावातील असल्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते.

Pune crime : चारित्र्याचा संशय घेऊन प्रेयसीच्या डोक्यात घातला दगड; निर्दयी प्रियकराला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्या
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : थेऊरमधील मृत तरुणीची ओळख पटली आहे. पाच दिवसांपूर्वी थेऊर येथील चिंतामणी हायस्कूलसमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात खून (Murder) झाला होता. यात संबंधित तरुणीचा मृतदेह सापडला होता. या मृत तरुणीची ओळख पटली असून खुनाचा तपास करणाऱ्या तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor police) अटक केली आहे. यानिमित्ताने अखेर या खुनाचा उलगडा झाला आहे. महेश पंडित चौगुले (वय 24, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. चिवरी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत तरुणीचा तो प्रियकर आहे. चारित्र्याचा संशय घेऊन त्याने आपल्या प्रेयसीचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तरुणीच्या आईसोबत बोलतांना पोलिसांना ही माहिती समजली.

एकाच ठिकाणी करत होते काम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौगुले हा तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. तर त्याची प्रेयसी केअरटेकर म्हणून काम करत होती. दोघेही एकाच गावातील असल्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यातच त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तरुणीचा मृतदेह 5 जुलैरोजी सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात तिचे नाव समजल्यावर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. संबंधित तरुणीच्या आईला विचारपूस केल्यानंतर आरोपी महेश चौगुले याच्यासोबत आपल्या मुलीचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

हे सुद्धा वाचा

तळेगाव दाभाडे परिसरातून घेतले ताब्यात

पोलिसांनी चौगुलेला तळेगाव दाभाडे परिसरातून ताब्यात घेतले. चारित्र्याच्या संशयातून आपण प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची कबुली महेश चौगुलेने दिली आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक अमित गोरे, राजेश दराडे, गणेश भापकर, निखील पवार, मल्हारी ढमढेरे आदींनी ही कारवाई केली.