Pune Corona update | राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु ; मोनलूपिरावीर या औषधांचा सर्रास वापर टाळावा -डॉ. कपिल झिरपे

मोनलूपिरावीर या औषधांचा सर्रास डॉक्टरांनी सर्रास वापर करू नये असे त्यांनी म्हटले आहे. हे औषध अँटी व्हायरल आहे. हे औषध कोरोनाच्या विषाणूला रिप्लिकेट करते. या औषध कोरोनाचे विषाणू वाढू न देण्यास मदत करते. ओमिक्रॉन संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. दोन दिवसात तो दुप्पट होत आहे.

Pune Corona update | राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु ; मोनलूपिरावीर या औषधांचा सर्रास वापर टाळावा -डॉ. कपिल झिरपे
Dr. Kapil Zirpe
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 2:09 PM

पुणे – राज्यातील कोरोनाचौ तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तर ओमिक्रॉन संसर्गाचा वेग 48 तासात दूप्पट झाला आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढणारा आहे . जानेवारीच्या अखेरीस हीलाट ओसरेल अशी शक्यता टास्कफोर्सचे सदस्य डॉ. कपिल झिरपे यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाच्या नियमाचे काटेकोर पद्धतीने पालन करावे, गर्दीची ठिकाणे टाळावीत असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

मोनलूपिरावीर या औषधाचा वापर टाळा
मोनलूपिरावीर या औषधांचा सर्रास डॉक्टरांनी सर्रास वापर करू नये असे त्यांनी म्हटले आहे. हे औषध अँटी व्हायरल आहे. हे औषध कोरोनाच्या विषाणूला रिप्लिकेट करते. या औषध कोरोनाचे विषाणू वाढू न देण्यास मदत करते. ओमिक्रॉन संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. दोन दिवसात तो दुप्पट होत आहे. मुंबई-पुण्यत सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. कम्युनिटी स्प्रेडींगलाही सुरुवात झाली आहे.

राज्य सरकारने घेतली दखल

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महाराष्ट्र टास्क फोर्सने वेगवगेळ्या मार्गदर्शक सूचना निर्माण केल्या आहेत. गरजेनुसार त्याची माहिती दिली जात आहे. राज्य सरकार व टास्क फोर्सने याची दखल घेतली आहे. मात्र लोकांनी या लाटेला घाबरून न जाता धीराने सामोरे जायचे आहे लक्षात ठेवले पहिजे. याबरोबरच नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

ओव्हरटेक करताना स्कूटर घसरली, पुण्यात 20 वर्षीय तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

MSEC Scholarship Result Topper : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा, अहमदनगरचा डंका, गुणवत्ता यादी जाहीर

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 8 January 2022