Vasant More : कितीही तोडा, जोडा, महापौर मनसेचा होणार, वसंत मोरेंना खात्री; पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना बदलावरून सरकारवर टीकास्त्र

| Updated on: Aug 05, 2022 | 3:17 PM

जसे नगरपरिषदेचे महापौर जनतेतून निवडून येतात, तसे महापालिकेचे महापौरही जनतेतून निवडून आणण्याचा कायदा करा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे करावे, असे आव्हान वसंत मोरे यांनी सरकारला त्यांनी दिले.

Vasant More : कितीही तोडा, जोडा, महापौर मनसेचा होणार, वसंत मोरेंना खात्री; पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना बदलावरून सरकारवर टीकास्त्र
मनसे नेते वसंत मोरे
Image Credit source: Facebook
Follow us on

पुणे : कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल, असा विश्वास मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात टीव्ही 9सोबत बातचित करत होते. महापालिकांच्या प्रभाग रचनेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मागील वेळी चार सदस्यीय प्रभाग रचना होती. ती बदलून तीन सदस्यीय करण्यात आली. त्यात बराच वेळ गेल्यानंतर आता पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग (Ward) करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या प्रभाग रचनेच्या निर्णयावरून वसंत मोरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राजकारणाची (Politics) चीड यायला लागली आहे. हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. प्रत्येकजण सोईने प्रभाग रचना बदलतो आहे, असा आरोप वसंत मोरे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

‘दीड-दोन कोटी वाया’

तीनची प्रभागरचना महाविकास आघाडीने केली होती. मतदान केंद्र, मतदार याद्या यासर्व गोष्टी फायनल झाल्या होत्या. अशावेळी पुन्हा नव्याने या सर्व गोष्टी करणे म्हणजे आधीचे दीड-दोन कोटी वाया गेले. हा खर्च कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. एवढे सगळे करत आहात तर मग आणखी एक गोष्ट करा, की जसे नगरपरिषदेचे महापौर जनतेतून निवडून येतात, तसे महापालिकेचे महापौरही जनतेतून निवडून आणण्याचा कायदा करा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे करावे, असे आव्हान त्यांनी सरकारला त्यांनी दिले.

काय म्हणाले वसंत मोरे?

‘त्यांना नागरिकांशी काहीही देणेघेणे नाही’

प्रभाग रचनेवरून जे काही चालले आहे, ते केवळ राजकारण आहे. यांना जनतेशी, नागरिकांशी काहीही देणेघेणे नाही. आम्हाला चारच्या प्रभागात फार मोठे यश आले होते, असे भाजपाला वाटते. तुमच्या नगरसेवकांनी पुणे शहरात काम केले आहे, तर मग चारचा काय, तीन आणि दोनच्या प्रभागातही तुम्हाला यश मिळायला पाहिजे. एवढे सगळे चुकीचे करत असताना आमची एक मागणीही मान्य करून आणखी एक चूक करा, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, प्रशासकाची सत्ता सध्या असून कोणतेही विकासकाम होत नाही. कुणाला सांगणार, असा सवाल करत लवकरात लवकर निवडणूक घ्या, असे ते म्हणाले.