ये…तू लक्षात ठेव…वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीचे विकास लवंडे यांच्यावर शाईफेक

Vikas Lavande Ink Thrown by Sangram Bhandare: वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात कट्टर हिंदुत्वादी घुसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. त्याविरोधात आज राष्ट्रवादीचे नेते विकास लवंडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

ये...तू लक्षात ठेव...वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीचे विकास लवंडे यांच्यावर शाईफेक
राष्ट्रवादी नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम भंडारे
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 09, 2026 | 11:07 AM

Vikas Lavande Ink Thrown by Sangram Bhandare: वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वादा आता चांगलाच पेटला आहे. वारकरी संप्रदायात गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी आणि धारकरी घुसरल्यावरून वाद झाला होता. वारकरी चळवळ हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मध्यंतरी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्याविरोधात दीर्घ लेख लिहिला. त्यांनी ते 40 घुसखोर महंत , कीर्तनकार कोण यांची नावे समोर आणणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही नावंही समोर आली होती. तर शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकऱ्यांमध्ये मनुवादी घुसल्याचा, घुसखोर असल्याचा आरोप केला होता. त्यांनी काही कीर्तनकारांवर आरोप केले होते. त्यानंतर आज आळंदीत सकाळी लवंडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हभप संग्राम भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केली.

संग्राम भंडारे यांनी फासले काळे

संग्राम महाराज भंडारे यांनी कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना काळ फासले. लवांडे यांनी गुरुवर्य साधुसंत हे घुसघोर असल्याचे वक्तव्य केलं होतं. या कारणावरून संग्राम महाराज भंडाऱ्यांनी आज काळ फासले. विकास लवंडे हे आज म्हातोबाची आळंदी येथे आला असता हा प्रकार घडला असून विकास लवांडे यांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

आज सकाळी विकास लवांडेवर शाईफेक

हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची इथं सकाळी 10 वाजता ही घटना घडली. शरद पवार  गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर ही शाईफेक करण्यात आली. हभप संग्राम भंडारे यांनी साथीदारांच्या मदतीने ही शाईफेक केली. यावेळी भंडारे हे त्यांच्यावर ओरडत असताना दिसतात. लवांडे, तू लक्षात ठेव. आमच्यावर काहीही बोल, काही फरक पडत नाही. पण आमच्या गुरुवर्यावर टीका करू नको असे भंडारे बोलत होते. गुरुवर्यांवर टीका केल्यानेच आपण लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याचाा दावा हभप संग्राम भंडारे यांनी केला.

विकास लवांडे यांचा कुणावर रोख?

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला एका मासिकात शरद पवार यांनी लेख लिहिला होता. त्यात वारकरी संप्रदाय मध्ये प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केल्याचा आरोप केला होात. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय मधे घुसखोरी करणाऱ्या लोकांची यादी प्रसिद्ध केली होती.

तर राष्ट्रवादीने गेल्या महिन्यात एक बॅनरही प्रकाशित केले होते. त्यात किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी, गौतम खट्टर, संभाजी भिडे गुरूजी, संग्राम भंडारे, तुषार भोसले, अक्षय भोसले, प्रकाश जवंजाळ, एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जळकीकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज, संजय नाना धोंडगे, राणा वासकर, चंद्रशेखर देगलूरकर, उदबोध पैठणकर, किशोर शिवणीकर, रामगिरी महाराज, शाम राठोड, निरंजन कोटेकर या कीर्तनकारांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी केल्याचा आणि ते वारकरी संप्रदायाची सामाजिक समतेची वीण उसवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

Follow Us